एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार, 16 सप्टेंबरला मराठवाडा चक्क जामची हाक

Maratha Reservation : आजपासून जालना शहर आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातील आप आपल्या गावागावांमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

जालना :  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात देखील जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळत आहे. तर, आजपासून (11 सप्टेंबर) जालना शहर आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातील आप आपल्या गावागावांमध्ये तालुका व जिल्ह्यात अतिशय शांततेत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास येत्या 16 सप्टेंबर रोजी संपुर्ण मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी दिली आहे. 

अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या उपोषणावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार, अश्रूधूर गोळीबार केली असून, याची सखोल न्यायालयीन चौकशी करणे, निष्पाप गावकऱ्यावरील गंभीर गुन्हे परत घेण्यात यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने करण्यात येत आहे. तर, सकळ मराठा समाज व मराठा समाजाच्या विविध सामाजिक संघटना, आरक्षणाला पाठिंबा देणारे समविचारी राजकीय पक्ष आणि विविध धर्म जाती संघटना यांच्यावतीने या मागणीला पाठींबा मिळत आहे. तर, आजपासून जालना शहर आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातील आप आपल्या गावागावांमध्ये तालुका व जिल्ह्यात अतिशय शांततेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.  सतेच 16 सप्टेंबरला मराठवड्यात चक्का जामची हाक देण्यात आली आहे. 

गुन्हे मागे घेण्याची मागणी! 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात येत होते. दरम्यान, पोलिसांकडून यावेळी लाठीमार करण्यात आला होता. ज्यात अनेक गावकरी जखमी झाले होते. तर काही पोलीस देखील गंभीर जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गावकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, पोलिसांनीच लाठीमार करून जखमी केले असून, गावकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने करण्यात येत आहे. तर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी देखील हे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे. 

राज्यभरात आंदोलन सुरूच...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. कुठे साखळी उपोषण, कुठे आमरण उपोषण, तर कुठे रास्ता रोको करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी आंदोलनालात हिंसक घटना सुद्धा समोर येत आहे. विशेष म्हणजे आंदोलनाचे लोण आता गावागावात जाऊन पोहचले आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिले मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारलेत का? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget