एक्स्प्लोर

मराठा आरक्षणप्रश्नी 2 सप्टेंबरला राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार : विनायक मेटे

अशोक चव्हाण यांनी आरक्षण समितीचे अध्यक्ष असून देखील मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. याबाबत बैठकीतील सर्वांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला.

मुंबई : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नी राज्यव्यापी बैठक आज आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला 24 जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. 102 व्या घटनादुरुस्तीबाबत जो कायदा करण्यात आला त्याबाबत आज बैठकीमध्ये चर्चा झाली. राज्य सरकार याबाबत काहीच पावलं उचलत नाही. बैठकीत उद्धव ठाकरे सरकारबाबत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. अजित पवार यांच्या देखील अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. त्यांनी सारथी बाबत त्यांनी उत्तम काम केलं, असं शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सांगितलं. 

अशोक चव्हाण यांनी आरक्षण समितीचे अध्यक्ष असून देखील मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. याबाबत बैठकीतील सर्वांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. यावेळी अशोक चव्हाण यांना तत्काळ अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी अशी देखील मागणी केली. अशोक चव्हाण यांना आम्ही विश्वासघातकी पुरस्कार देणार आहोत, असं विनायक मेटे यांनी म्हटलं. 

राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये बहुतांश लोक मराठा समाजाच्या विरोधात काम करणारे आहेत. मुळात आयोगावरील लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही मात्र लोणावळा येथे आयोजित एका ओबीसी समाजाच्या बैठकीला ही मंडळी गेली होती. आणि त्यांनी भाषणं देखील केली होती. आम्ही आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला कारण त्यांनी त्यांच्या संस्थेत 1 वर्षे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केलं आहे, असं विनायक मेटे यांनी म्हटलं. 

आम्ही 2 सप्टेंबरला संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. 7 किंवा 8 सप्टेंबरला एक राज्यव्यापी बैठक घेणार आहोत. त्यानंतर आम्ही गणपती विसर्जनानंतर आझाद मैदानाला उपोषणाला बसणार आहोत. आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. त्यानंतर आम्ही मुंबईत महामोर्चा काढणार आहोत. उद्या आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सकाळी 10 वाजता भेट घेणार आहोत. या भेटीवेळी आम्ही राज्य सरकार जाणिवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे याबाबत बोलणार असल्याचं मेटे यांनी सांगितलं. सरकारला त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी जाब विचारावा आणि ओबीसी आयोग बरखास्त करावा अशी देखील मागणी करणार असल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Embed widget