एक्स्प्लोर

मराठा समाजाला किती टक्के आरक्षण? उद्या निर्णय

या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, सुभाष देशमुख, विनोद तावडे, गिरीश महाजन उपस्थित होते. मराठा आरक्षणासंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची ही पाचवी बैठक होती.

मुंबई : मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे यावर आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. मराठा समाजाला 12 टक्के, 14 टक्के की 16 टक्के आरक्षण द्यायचं यावर आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यामुळे किती टक्के आरक्षण द्यायचं याबाबत उद्या निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, सुभाष देशमुख, विनोद तावडे, गिरीश महाजन उपस्थित होते. मराठा आरक्षणासंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची ही पाचवी बैठक होती. दरम्यान उद्या सकाळी एटीआर रिपोर्ट सभागृहात ठेवला जाईल. संध्याकाळपर्यंत विधेयक सभागृहात मांडलं जाईल. उद्या सकाळी पुन्हा 10 वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होईल. ज्यामध्ये किती टक्के आरक्षण द्यावं यावर शिक्कामोर्तब होईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षण अहवालासाठी विरोधकांची सरकारविरोधात हक्कभंगाची सूचना हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण अहवालासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी विरोधकांनी सरकारविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची सूचना विधानपरिषदेत मांडली आहे. यावर विधानपरिषद सभापतींनी सूचना तपासून पाहून मंत्र्यांकडून रिप्लाय मागवून घेऊ असे सांगितले आहे. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्तावाबाबत सूचना सादर केली आहे. याआधीच रणपिसेंनी हक्कभंगाची नोटीस विधानपरिषदेच्या सभापतींना पाठवली होती. शिवाय सरकारकडून मराठा अहवाल सभागृहापासून लपवला जात असल्याचा आरोप रणपिसेंनी केला आहे. विरोधक आणि सरकार दोघांनाही मराठा आरक्षण हवं आहे. कृती अहवाल आणि विधेयक एकत्र आणलं तर विरोधकांना विरोध करण्यासाठी जागाच राहणार नाही. आजचा दिवस सोडल्यास हिवाळी अधिवेशनाचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. परिणामी वेळच नसल्यामुळे विधेयक मंजूर करुन घेणं ही सत्ताधारी आणि विरोधकांचीही जबाबादारी आहे. शिवाय विधेयकाला विरोध केल्यास जनमत विरोधात जाण्याची भीती विरोधकांना आहे. विरोधकांच्या मनात काळंबेरं, पण मराठा आरक्षण देणारच : मुख्यमंत्री आमदारांना व्हीप जारी दुसरीकडे सभागृहात दगाफटका टाळण्यासाठी भाजप, शिवसेनेनेपाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसन आपापल्या आमदारांना पुढील तीन दिवसांसाठी व्हीप जारी केला आहे. हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे महत्त्वाचे तीन दिवस शिल्लक आहेत. या तीन दिवसात मराठा आरक्षणाचा कृती अहवाल, विधेयक सादर करुन ते मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे महत्त्वाचं कामकाज आणि विधेयक पाहता आमदांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंचं विधेयकाला पाठिंबा देण्याचं आश्वासन : पाटील दरम्यान, आरक्षणासंदर्भात शिवेसेनेच्या पाठिंब्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल (27 नोव्हेंबर) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनीही विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. अहवालासाठी विरोधक आग्रही दुसरीकडे सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करावा, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. मात्र कलम 14 आणि 15 दाखला देत राज्य सरकार नियमानेच कार्यवाही करत असून विधेयक मांडण्याआधी एटीआर मांडण्यात येईल, जो कायद्यानुसार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ओबीसी आरक्षणाला बाधा नाही : मुख्यमंत्री "तसंच ओबीसी समाजाच्या 52 टक्के आरक्षणाला बाधा न आणता सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे. राज्यात सध्या 52 टक्के आरक्षण आहे, 50 टक्के नाही. एसईबीसीचं आरक्षण जिवंत आहे. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे," असंही मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितलं. संबंधित बातम्या मराठा आरक्षणाचा ATR आज विधानसभेत; भाजप, शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी मुख्यमंत्री-गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच, तोडगा नाहीच मराठा आरक्षण 5 डिसेंबरला लागू होणार : सूत्र आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकार मराठा आरक्षणाच्या अहवालावर एटीआर मांडणार मुख्यमंत्री का घाबरत आहेत? : जयंत पाटील 29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election Results : कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget