एक्स्प्लोर

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच!

CM Eknath Shinde on maratha reservation : मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झालं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला आमचा कुणाचाही विरोध नाही, त्यामुळे याला बहुमत म्हणा किंवा एकमत म्हणा, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

CM Eknath Shinde on maratha reservation : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण विधेयक (Maratha reservation) आज विधीमंडळाच्या पटलावर ठेवलं. मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झालं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला आमचा कुणाचाही विरोध नाही, त्यामुळे याला बहुमत म्हणा किंवा एकमत म्हणा, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण विधेयक हे बहुमताऐवजी एकमताने मंजूर होत आहे, असं जाहीर केलं.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण आम्ही देत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने (Maharashtra Government) आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन (Maratha Reservation Special Assembly session ) बोलावलं. यामध्ये मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानंतर सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. त्याला मंत्रिमंडळ मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मांडलं. 

मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच

मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकणारच. राज्य सरकारने घेतलेला निर्णय मोठा आणि धाडसी निर्णय आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

मराठा आरक्षणासाठी शिवाजी महाराजांची शपथ 

विरोधी पक्षनेते यांनी मला याबाबतीत मला मुद्दे आणि पत्र दिले आहे. ⁠त्यामुळे या संदर्भात मी स्पष्टीकरण देत आहे. ⁠कालच शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी केली. ⁠शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होऊन आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. ⁠हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. ⁠मला मराठा समाजाच्या वेदनांची माहिती आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे एका जाती धर्माचा विचार करता येणार नाही. त्यामुळे इतर समजासाठी ही तीच भावना आहे. ⁠सब का साथ सबका विकास हे ब्रीद वाक्य मोदी साहेब यांनी दिलं आहे. ⁠एकाची बाजू घेण्याच माझ्याकडून होणार नाही. ⁠कोणतयाही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आहे. आपण सर्वजण एकाच मताचे आहोत. ⁠नोकरी आणि  शैशैक्षणिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

 ⁠ना कोणावर अन्याय, ना कोणाला धक्का  

आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. ना कोणावर अन्याय, ना कोणाला धक्का असा निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री असलो तरी आंदोलकांना भेटलो. तुमच्यापेक्षा जनता मोठी आहे.  यामुळे त्यांना पहिलं भेटा असं बाळासाहेब म्हणाले होते. ⁠ एकनाथ शिंदे यांनी वेळ मारुन नेतील असं काही जण म्हणाले. मात्र शब्द देताना शंभरवेळा विचार करतो. ⁠तो मी पाळतो, ⁠यावर मला राजकीय बोलायचं नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

 आंदोलनं राज्याच्या विकासाला न परवडणारी  

काही घटना घडल्या, त्या घडायला नको होत्या. ⁠ही आंदोलनं राज्याच्या विकासाला न परवडणारी आहेत. अनेकांना वाटतं की चुटकीप्रमाणे निर्णय झाला पाहिजे. ⁠आचारसंहिता लागेल मग कसं होणार या संदर्भात माझ्यावर काही आरोप ही झाले. ⁠दीडशे दिवस हे अहोरात्र काम सुरु होतं. ⁠तीन ते चार लाख लोक काम करत होते, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. 

22 राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण  

हा कायदा कोर्टात टिकेल याची खात्री बाळगा. आपण काहीही बेकायदेशीर करत नाही. ⁠आपण सर्व  कायदेशीर करतो.  22 राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण आहे. 50 टक्के आरक्षण मर्यादा आपण ओलंडली. ⁠सुप्रीम कोर्टाने आपल्याला अधिकार दिलाय.  हा कायदा टिकेल. ⁠या आंदोलनात काही मृत्यूही झाले. ⁠त्यांच्यासंदर्भात संवेदना व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

गोड दिवशी कडू नको - एकनाथ शिंदे

कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण देत आहे. ⁠मागे काय झालं हे बोलत नाही. ⁠गोड दिवशी कडू नको, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

अध्यादेशावर सहा लाख हरकती  

सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी काढल्या त्या पूर्ण करण्याचं काम करत आहे. आरक्षण टिकून रहावं यासाठी राज्य सरकार सर्व ताकद लावणार आहे. ⁠विरोधी पक्षांनाही सोबत ठेवणार आहे. ⁠कुणबी दाखला संदर्भात ही समिती काम करत आहे. सहा लाख हरकती आलेल्या आहेत. ⁠यावर प्रक्रिया सुरु आहे. जी अधिसूचना काढली आहे त्यावर हरकती आल्या आहेत. त्यावर छाननी सुरू आहे. ⁠त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. ⁠१९६७ पूर्वी नोंदी आहे, त्यांना आरक्षण दिलं जाईल. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

तीन महिन्यात निर्णय घेतला  

 शिवरायांची शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यांत मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. ⁠हा सॅम्पल सर्व्हे नाही तर डिप सर्व्हे आहे. ⁠अडीच ⁠कोटी लोकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. ⁠सरकार कोणताही दुजाभाव करणार नाही. ⁠घाईगडबड करणं योग्य नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेत आहे. ⁠सरकार जे बोलतं ते करतं हे आंदोलनंकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. एकमताने हे विधेयक मंजूर करावं अशी विनंती करत आहे.  टिकणारं हे विधेयक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

CM Eknath Shinde speech VIDEO :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठा आरक्षण विधेयकावरील संपूर्ण भाषण

मुख्यमंत्री काय म्हणाले? 

- विरोधी पक्षनेते यांनी मला याबाबतीत मला मुद्दे आणि पत्र दिले आहे 
- ⁠त्यामुळे या संदर्भात मला स्पष्टीकरण देत आहे
- ⁠कालच शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी केली
- ⁠शिवाजी महाराज यांच्यापुढे नतमस्तक होऊन आरक्षण देण्याची शपथ घेतली होती
- ⁠हे सर्व महाराष्ट्राने पाहील आहे
- ⁠मला मराठा समाजाच्या वेदनांची माहीत आहे
- मी राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे एका जाती धर्माचा विचार करता येणार नाही
- त्यामुळे इतर समजासाठी ही तीच भावना आहे 
- ⁠सबका साथ सबका विकास हे ब्रीद वाक्य मोदी साहेब यांनी दिल आहे
- ⁠एकाची बाजू घेणायच माझ्याकडून होणार नाही
- ⁠कोणतयाही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आहे
- ⁠आपण सर्वजण एकाच मताचे आहोत
- ⁠नोकरी आणि  शैशैक्षणिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे
- आजचा दिवस ही कर्तव्यची जाणीव करुन देणार आहे
- ⁠ना कोणावर अन्याय नी कोणाला धक्का असा निर्णय घेत आहे
- ⁠ मुख्यमंत्री आसलो तरी आंदोलकांना भेटलो
- ⁠तुमचयापेक्षा जनता मोठी आहे तसं यामुळे त्यांना पहिलं भेटा अस बाळासाहेब म्हणाले होते
- एकनाथ शिंदे यांनी वेळ मारुन नेतील अस काही जण म्हणाले
- ⁠मात्र शब्द देताना शंभरवेळा विचार करतो 
- ⁠तो मी पाळतो
- ⁠यावर मला राजकिय बोलायचं नाही
- ⁠मात्र जयंत पाटील मी शब्द दिला की तो मी पाळतो
- काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या
- ⁠ही आंदोलन राज्याच्या विकासाला न परवडणारी आहेत
- ⁠ अनेकांना वाटत की चुटकी प्रमाणे निर्णय झाला पाहीजे अस अनेकांना वाटत
- ⁠आचार संहिता लागेल मग कस होणार या संदर्भात माझ्यावर काही आरोप ही झाले
- ⁠दिडशे दिवस हे अहोरात्र हे काम सुरु होत
- ⁠तीन ते चार लाख लोक खाम करत होते

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
Embed widget