एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा न करु देण्यावर मोर्चेकरी ठाम

आषाढीनिमित्त संध्याकाळपर्यंत पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल होणार आहेत. मात्र या भक्तीरसाने गरजणाऱ्या पंढरपुरात मराठा मोर्चाही सुरु आहे.

पंढरपूर : टाळ-मृदंग आणि विठ्ठल नामाने पंढरपूर दुमदुमू लागलंय. आषाढीनिमित्त संध्याकाळपर्यंत पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल होणार आहेत. मात्र या भक्तीरसाने गरजणाऱ्या पंढरपुरात मराठा मोर्चाही सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरासह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पंढरपुरात दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासह इतर अनेक मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा, यासाठी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. लाखो वारकरी पंढरपुरात येणार असल्याने कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. दुसरीकडे सरकार आणि काही वारकऱ्यांकडूनही या सोहळ्याला गालबोट लागू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र ठिकठिकाणची आंदोलनं आणि पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांवर होणारी दगडफेक यामुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राज्यभरातून पंढरपूरकडे येणाऱ्या 16 बसेस फोडण्यात आल्या आहेत. या बसमधून प्रामुख्याने वारकरीच प्रवास करतात. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. सध्या पंढरपुरात सात लाख वारकरी दाखल झाले आहेत. संध्याकाळपर्यंत हा आकडा बारा ते पंधरा लाखांपर्यंत जाऊ शकतो. पालख्या आता वाखरी मुक्कामी आहेत, दुपारच्या जेवणानंतर निघतील आणि रात्री आठ वाजेपर्यंत पंढरीत दाखल होतील. यावेळी पहिल्यांदाच मुंबई पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chocolate : धक्कादायक! चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Raigad Rain Update : पालीचा अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले, मुख्य सभागृहात पहिल्यांदाच पाणीच पाणी
पालीचा अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले, मुख्य सभागृहात पहिल्यांदाच पाणीच पाणी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
धक्कादायक! रायगडमध्ये भरतीमुळं समुद्राला उधाण, लाटांमुळं मच्छिमारांची बोट बुडाली, भिवंडीतही 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता
धक्कादायक! रायगडमध्ये भरतीमुळं समुद्राला उधाण, लाटांमुळं मच्छिमारांची बोट बुडाली, भिवंडीतही 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget