एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा समाजाकडून आजही आंदोलन, ठिकठिकाणी चक्काजाम, राज्यभरात परिस्थिती काय?

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मराठा बांधवांकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. आजदेखील मराठा बांधव आक्रमक झाल्याचे दिसून येते.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाजाकडून काल राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी महामार्ग ब्लॉक करण्यात आले होते. आजदेखील मराठा बांधव (Maratha Reservation) आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. राज्यभरातील सध्याची परिस्थिती काय जाणून घ्या...

पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर चक्काजाम

सातारा पुणे या मार्गावरून येणाऱ्या मार्गावर वाखरी चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केल्याने सातारापुणे मार्गावरून येणारी शेकडो वाहने अडकून पडली आहेत. गोपाळपूर चौकात केलेल्या चक्क जाममुळे मंगळवेढा आणि कर्नाटकमधून येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय कासेगाव येथे सुरु असलेल्या चक्का जाममुळे कोल्हापूर आणि कोकणातून येणारी वाहतूक थांबली आहे. या रास्ता रोकोमुळे पंढरपूरातून (Pandharpur) देखील वाहने बाहेर पडू शकत नसल्याने सर्वच मार्गांवर शेकडो एसटी बसेस अडकून पडल्या आहेत. सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असून सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन केले जात आहे.

दुसऱ्या दिवशीही परभणीत मराठा समाजाचे आंदोलन 

परभणीत (Parbhani) दुसऱ्या दिवशीही मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. परभणीच्या सेलू-परतूर महामार्गावरील हदगाव खुर्द येथे रस्त्यावर टायर जाळून आणि जागोजागी काटेरी झुडपे, दगडे आडवे लावून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या मार्गावरची  वाहतूक मराठा समाज बांधवांनी बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात 500 हून अधिक बस फेऱ्या रद्द

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील गिरगाव पाटीवर कालपासून रास्तारोको आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत आणि हिंगोली या तीनही आगारातील बस सेवा बंद आहे. त्यामुळे 500 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बीड जिल्ह्यात वाहतूक खोळंबली

बीड (Beed) जिल्ह्यातील परळीत बीड व गंगाखेड रस्त्याला जोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक-इटके कॉर्नर येथे सकाळी 10 पासून मराठा समाजाने रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केले. या चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यात गाड्या लावून आंदोलकांनी वाहतूक थांबवत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

नाशिक-मुंबई महामार्गावर रास्ता रोको 

नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik - Mumbai Highway) आडगावजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे. नाशिकचे मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच नाशिक-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.   

आणखी वाचा 

कुणबी नोंदीवाल्यांना नवं आरक्षण नाही, हे सांगणं चुकीचं - मनोज जरांगे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 23 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Embed widget