एक्स्प्लोर
कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले
गेल्या काही वर्षात तारकर्ली आणि देवबाग हे समुद्रकिनारे इतके नावारुपाला आले की इथल्या किनाऱ्यांवर सतत पर्यटकांची गर्दी असते.
सिंधुदुर्ग : दिवाळी संपली असली तरी शाळा आणि कॉलेजची सुट्टी अजूनही संपली नाही आणि या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी अनेकांनी कोकण गाठलं आहे. त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीनं मालवणचे किनारे अक्षरश: फुलून गेले आहेत.
हिरवीगार झाडी... लालबुंद सूर्य.... डाव्या बाजूला नदी आणि उजव्या बाजूला समुद्र असं संगमावर वसलेलं लहानसं देवबाग.
देवबागमध्ये शिरल्यावरच तिथल्या वातावरणाच्या आपण प्रेमात पडतो. सध्या हिवाळ्याच्या सुट्टयांमुळे देवबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
कर्ली नदीच्या स्थितप्रज्ञ प्रवाहातून आपण प्रवासाला सुरुवात केली की उधाणलेला समुद्र आपल्याला त्याच्या कवेत घेण्यासाठी आसुसलेला असतो. संथ पाण्याच्या प्रवाहातून हळूहळू समुद्राच्या लाटांवर स्वार होताना मनालाही गुदगुल्या होतात.
नदीतून थोडासा प्रवास झाला की आपण लहानशा बेटावर उतरतो आणि इथले वॉटर स्पोर्ट आपल्याला खुणावत असतात. बनाना राईड, पॅरासिलिंग, स्पीड बोट या सगळ्याचा तुफान अनुभव घेतल्याखेरीज आपली सहल पूर्ण होऊच शकत नाही.
गेल्या काही वर्षात तारकर्ली आणि देवबाग हे समुद्रकिनारे इतके नावारुपाला आले की इथल्या किनाऱ्यांवर सतत पर्यटकांची गर्दी असते.
पण जर तुम्हाला निरव शांतता अनुभवायची असेल तर येथील किनारे तुमची वाट पाहत आहेत. त्यामध्ये भोगवे, निवती, सागरेश्वर, तळाशीर, तोंडवळी, वेळागर, मोचेमाड इथल्या किनाऱ्यांवर तुम्हाला जाता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement