मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक, मध्यरात्री वर्षावर खलबत
मराठा आरक्षणप्रश्नी सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आमरण उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. अद्याप मराठा आरक्षणाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची आज रात्री उशिरा वर्षावर बैठक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग
मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी रात्री उशीरा बैठक होणार आहे. आरक्षणाच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या चर्चेतून काही ठोस तोडगा निघतो का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
एकनाथ शिंदे साताऱ्याहून तर अजित पवार पुण्यातून मुंबईच्या दिशेनं रवाना
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी आले होते. मात्र, ते देखील तातडीने मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होतील. यामध्ये नेमका काय तोडगा निघणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर अरदाडे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल
दरम्यान, सध्या छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर अरदाडे हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे काही पेपर होते ते मनोज जरांगे पाटील यांना दाखवले आहेत. हैदराबाद गॅजेट्स संदर्भात त्यांच्याकडे महत्त्वाचे पेपर ते घेऊन आले होते. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे देखील मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आझाद मैदान मध्ये आले आहेत. हैद्राबाद गॅझेट, मोडी लिपी, जुन्या नोंदीच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर अरदाडे यांची मनोज जरांगेसोबत चर्चा सुरु आहे.शासनाच्या प्रतिनिधींसह शिंदे समितीसोबत जरांगे पाटील चर्चा करण्यासाठी मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
























