एक्स्प्लोर
माणिकराव ठाकरेंचा मुदतीपूर्वीच उपसभापतीपदाचा राजीनामा
काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने माणिकरावांनी हा निर्णय घेतला. सदस्यपदाचा कार्यकाळ संपवण्याआधीच ठाकरेंनी राजीनामा दिला आहे.
नागपूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी आपल्या उपसभापतीपदाचा कार्यकाळ संपवण्याआधीच राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा सभापतींना सुपूर्द केला. काँग्रेसने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने माणिकरावांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटलं जात आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच पक्षाची एक भूमिका जाहीर केली होती. त्यात त्यांनी ‘पक्षाचा जे उमेदवार निवडणूक लढवू शकतात, त्यांना विधानपरिषद, राज्यसभा यांचे तिकीट द्यायचे नसल्याची भूमिका जाहीर केली होती.’
यासंदर्भात माणिकराव ठाकरेंशी संपर्क साधला असता, ‘नवीन लोकांना निवडून येण्याची संधी मिळावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.’
विनायक मेटेंची प्रतिक्रिया
माणिकराव ठाकरेंनी सभापतींकडे राजीनामा सोपवल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटेंनी दिली आहे. सभागृहाला राजीनाम्याची माहिती देणे गरजेचं होत म्हणून मी हा प्रश्न उपस्थित केला. राजीनामा देण्यामागे त्यांच्यावर कोणता दबाव होता की नाराजी होती हे तेच सांगू शकतील असे मेटे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement