एक्स्प्लोर

काही पाप केलं नाही, जाहिराती स्कीप करत होतो, दोन तीन सेकंद लागले, तुम्हाला जाहिरात येत नाही?; जंगली रमीच्या नादावर माणिकराव कोकाटेंचा खुलासा करताना दमछाक

Manikrao Kokate: थेट विधिमंडळामध्येच जंगली रमी गेम खेळतानाचा आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

Manikrao Kokate: मंत्रीपद मिळाल्यापासूनच वादाची किनार लाभलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. थेट विधिमंडळामध्येच जंगली रमी गेम खेळतानाचा आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना जंगली रमीच्या व्हायरल व्हिडिओवर उत्तर देताना चांगलाच दम लागल्याचे दिसून आले. कोकाटे यांनी आपल्या व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की, मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो त्यावेळी कनिष्ठ सभागृहात काय चाललय पाहण्यासाठी youtube प्ले करत होतो. मात्र युट्युब प्ले करत असतानाच जाहिरात आली, ती जाहिरात स्कीप करताना दोन-तीन सेकंद लागले. तुम्हाला तशी जंगली रमी जाहिरात येत नाही का? असा उलट सवाल कोकाटे यांनी केला. 

मी काही पाप केलं नाही

कोकाटे यांनी आपला बचाव करताना मी काही पाप केलं नसल्याचे म्हणाले ते म्हणाले. मी जाहिराती स्किप करत होतो त्यामध्ये दोन-तीन सेकंद लागले ते त्यांना दाखवायचं नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेला कामावरती ते बोलत नाहीत. माझं काम पारदर्शकपणे असल्याने मी कशाला अशा पद्धतीने गेम खेळत बसू असं सावरासारव माणिकराव कोकाटे यांनी केली. ते म्हणाले की माझ्या काही लक्षात आलं नाही. दुसऱ्या सेकंदाला मी जाहिरात स्कीप केली. मात्र तेवढाच व्हिडिओ दाखवून टार्गेट करण्यात आल्याचे कोकाटे यांनी म्हटलं आहे. 

तुम्हाला जंगली रमीची जाहिरात येत नाही का?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही कोकाटे बोलले. ते म्हणाले की आम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही का? त्यासाठी आम्ही दौरे करत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहोत. मात्र, लोकांना बदनाम करण्यासाठी डाव असल्याचे कोकाटे म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये विशेष असे काय आहे, तुम्हाला जंगली रमीची जाहिरात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्येही अशा जाहिराती येतात. मात्र ते स्वतःची करमणूक करून घेत असल्याचे ते म्हणाले. 

माझ्या विभागासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे.

दरम्यान, भाजपला विचारून काम करावे लागते या टीकवर ते म्हणाले की कारण नसताना टार्गेट केलं जात आहे. मी आता कोणत्याही प्रकारचे विधान केलेले नाही. माझ्या विभागासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. या गोष्टीला एवढं महत्त्व का द्यावं? असा सुद्धा सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला. ते म्हणाले मीडिया इतकं डोक्यावर का घेत आहेत? दरम्यान, संजय राऊत यांनी अमित शाह चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे ठरवले असल्याचा दावा केला आह. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचे सुद्धा नाव असल्याचे राऊत म्हणाले. या संदर्भात विचारलं ते म्हणाले की त्या संजय राऊतला माहित असेल मला काय माहित नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी नवी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी नवी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget