एक्स्प्लोर
अनैतिक संबंधांना नकार दिल्याने दीराकडून वहिनीची हत्या
सुनिता लोखंडे यांचे गेल्या काही दिवसांपासून दीर पांडुरंग लोखंडेसोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण पती बयाजी लोखंडे यांना लागली. पती बयाजीने समजावून सांगितल्यानंतर सुनिता यांनी दीरासोबत असणारे सर्व संबंध तोडले होते.
सांगली : अनैतिक संबंधांना नकार दिल्याच्या रागातून दीराने वहिनीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या खिलारवाडी गावात ही घटना घडली.
सुनिता लोखंडे या विवाहितेची दीर पांडुरंगने चाकूने वार करुन हत्या केली. खिलारवाडीमध्ये बयाजी लोखंडे आणि पत्नी सुनिता लोखंडे मोल मजुरी करुन राहत होते. सुनिता लोखंडे यांचे गेल्या काही दिवसांपासून दीर पांडुरंग लोखंडेसोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण पती बयाजी लोखंडे यांना लागली.
पत्नी सुनिता यांना पती बयाजीने समजावून सांगितले. त्यानंतर सुनिता यांनी दीरासोबत असणारे सर्व संबंध तोडले होते. मात्र अनैतिक संबंध तोडल्याच्या रागातून रविवारी रात्रीच्या सुमारास पांडुरंगने आपल्या भावाचं घर गाठलं. घरी कोणी नसल्याचं पाहून सुनिता यांना मारहाण करत तिच्यावर चाकूने हल्ला केला.
पोटावर खोल वार झाल्यामुळे रक्तस्राव होऊन सुनिता यांचा जागीच मृत्यू झाला. सुनिता यांचे पती बयाजी लोखंडे घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर त्यांनी जत पोलिसात धाव घेत घटनेची माहिती दिली.
या प्रकरणी दीर पांडुरंग लोखंडे आणि त्याचा मित्र संजय कृष्णा सोलनकर या दोघांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement