राम सातपुतेंची धाकधूक वाढली! माळशिरसमधून तिकीट मिळणार की नाही? फडणवीसांच्या भेटीसाठी थेट सागर बंगल्यावर
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना अद्याप भाजपने उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळं सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी आले आहेत.
Ram Satpute : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे. भाजपनं (BJP) आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, यामध्ये काही विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली नाही. यामध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांचा समावेश आहे. त्यांना अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळं सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी आले आहेत.
पहिल्या यादीत राम सातपुतेंचं नाव नसल्यानं उमेदवारी मिळणार की नाही?
माळशिरसमधून भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानं राम सातपुते हे पुन्हा एकदा सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. राम सातपुते यांचं पहिल्या यादीत नाव नसल्यानं त्यांना उमेदवारी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोलापूर लोकसभेची उमेदवारी राम सातपुते यांना देण्यात आली होती. मात्र, काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी त्यांचा मोठा मताधिक्यानं पराभव केला होता. त्यानंतर राम सातपुते यांनी माळशिरसमधून विधानसभेचं तिकीट मिळणार का? याबाबत शंका उपस्थित केली जातेय.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्तमराव जानकर मैदानात
लोकसभेत पराभव झाल्यानंतर राम सातपुते यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. माळशिरसमधून विद्यमान आमदार सातपुते पुन्हा इच्छुक आहेत. दरम्यान, माळशिरसमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्तमराव जानकर हे निवडणूक लढवणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच त्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळं आता त्यांच्या विरोधात भाजप नवीन चेङरा शोधणार की पुन्हा राम सातपुते यांनांच निवडणुकीच्या मैदानात उतरवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: