एक्स्प्लोर
बुलडाण्यात देवदर्शनाहून परतताना अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
अपघातग्रस्त भाविक हे बुलडाण्यातील जाईचा देव येथे दर्शनासाठी आले होते.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर रोडवरील हिवरा आश्रमाजवळ देवदर्शनावरुन परतताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून गाडीचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. अपघातग्रस्त सर्व भाविक हे नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील रहिवासी असून एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये एका लहान बाळाच्या आईचा समावेश असून, अवघ्या 4 महिन्यांचे बाळ मात्र सुदैवाने वाचलं आहे. दर्शन आटोपून ते चिखली-मेहेकर मार्गे नांदेडला जाण्यासाठी निघाले असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हिवरा आश्रमाजवळ त्यांच्या गाडीने 3 ते 4 पलट्या मारल्या. अपघातग्रस्त भाविक हे बुलडाण्यातील जाईचा देव येथे दर्शनासाठी आले होते.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















