#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन LIVE : खासदार इम्तियाज जलील महाराष्ट्राचं व्हिजन मांडताना
Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे.
त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. सकाळी १० वाजेपासून तुम्ही हा कार्यक्रम एबीपी माझावर पाहू शकणार आहात.





















