Majha Maharashtra Majha Vision LIVE Updates: 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' आज दिवसभर एबीपी माझावर, राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती
Majha Maharashtra Majha Vision LIVE Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह राज्यातले प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद, आज दिवसभर एबीपी माझावर माझा महाराष्ट्र माझं व्हिजन.
राज्याचा उद्योगमंत्री बदलला तरी किमान पाच वर्षे तरी व्हिजन बदलायला नको असं खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईमुळे देशाचं पोट भरतंय, पण मुंबईला वाटा मिळतोय का? महाराष्ट्राला त्याचा वाटा मिळतोय का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
व्हिजन हे महाराष्ट्राचं असलं पाहिजे, एका व्यक्तीचं नको. उद्योगमंत्री बदलला की व्हिजन बदलतंय ही गोष्ट बरोबर नाही. उद्योगमंत्री कुणीही असो, व्हिजन कायम असायला पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले. व्हिजन या शब्दाचा अर्थ बदलला, सत्ता मिळवणं हेच व्हिजन आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जायचं हे त्या पुढचं व्हिजन असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले.
साल 2000 पासून साल 2022 पर्यंत प्रदूषणाच्या मृत्यूमध्ये 300 पट वाढ झाली आहे. हा चिंतेचा विषय आहे. यावर आज लक्ष दिल नाही, तर आपण ताटात जितकं अन्न घेतो, तितकंच आपल्याला औषध खावं लागेल, अशी अवस्था दूर नाही, असं सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
भाजपनं राष्ट्रवादीचे मतदारसंघ टार्गेट केलेत, याला राष्ट्रवादी कसं उत्तर देणार? या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपनं जसे लोकसभेसाठी मतदारसंघ टार्गेट केले आहेत. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघाचे दौरे करत आहेत, याचं मतदाराला काय देणं घेणं नाही. भाजपच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचाच आमदार असेल. 2019 जसं सरप्राइज मिळालं, तसेच पुन्हा 2024 मध्ये मिळेल, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जे जे शिवसेनेला सोडून गेलेत, त्यांचा आतापर्यंत पराभव झाला आहे. आता जे 40 सोडून गेलेत, त्यातील सहा सात कसे बसे निवडणून येतील, उरलेले सर्व पराभूत होतील, असे जयंत पाटील म्हणाले.
भाजपनं राष्ट्रवादीचे मतदारसंघ टार्गेट केलेत, याला राष्ट्रवादी कसं उत्तर देणार? या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपनं जसे लोकसभेसाठी मतदारसंघ टार्गेट केले आहेत. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघाचे दौरे करत आहेत, याचं मतदाराला काय देणं घेणं नाही.
CM Eknath Shinde Vision : "आम्ही आरोपांना कामाने उत्तर देतो म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाल्या. आमची तर इच्छा प्रामाणिक आहे मी जसं बोलतोय तुम्ही आरोप करा आम्ही कामाने उत्तर देऊ," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी आपलं व्हिजन मांडताना पायाभूत सुविधांबद्दल सरकार करत असलेले प्रयत्न याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसंच उद्योग, शेतकऱ्यांबद्दल सरकार काय करु पाहते तेही सांगितलं.
Devendra Fadnavis, Majha Maharashtra Majha Vision 2023: एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या आणि उद्धव ठाकेरंच्या मैत्री कटुता आलीये का? या प्रश्नावर भाष्य केलं. मातोश्रीचे (Matoshree) दरवाजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच माझ्यासाठी बंद केले. माझा फोनही त्यांनी घेतला नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात बोलताना दिली.
CM Eknath Shinde Vision : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले, सांगू का?? सगळंच काही सांगायचं नसतं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन मांडलं. यावेळी त्यांनी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुख्यमंत्र्यांनी आपलं व्हिजन मांडताना पायाभूत सुविधांबद्दल सरकार करत असलेले प्रयत्न याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसंच उद्योग, शेतकऱ्यांबद्दल सरकार काय करु पाहते तेही सांगितलं.
Devendra Fadnavis, Majha Maharashtra Majha Vision 2023: एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे यांना दिलेलं, असं देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. तसेच, तत्कालीन ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडीवरही त्यांनी टीकास्त्र डागलं. तसेच, पॉलिटिकल सरप्राईजेस देणारे फडणवीस आता आणखी काय सरप्राईज देणार का? फडणवीसांचा 'प्लान ए' अजित पवार, 'प्लान बी' एकनाथ शिंदे, आता 'प्लान सी' अशोक चव्हाण असणार का? या प्रश्नांचं उत्तरही फडणवीसांनी दिलं.
Devendra Fadnavis Majha Vision : ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार बजेटच्याच आधी होणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, राज्यपालांच्या पदमुक्तीसंदर्भात बोलताना ते माझ्याशी खासगीत बोलताना अनेकदा मला पदमुक्त करा असे म्हणाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. त्याचप्रमाणे राज्यातील सत्तांतर आणि सत्तासंघर्ष याबाबतही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे ही तुमची एकट्याची मालमत्ता नाही, असं म्हणत पुन्हा एकदा ठाकरेंवर फडणवीसांना निशाणा साधला. तर, भाजप-शिवसेना युती आणि शिवसेनेतील बंड याबाबत बोलताना मातोश्रीचे दरवाजे तुम्ही बंद केलेत, असंही देवेंद्र फडणवीस ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
Majha Maharashtra Majha Vision 2023: आज 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात राज्यासाठी आपलं व्हिजन मांडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 11 वाजता देवेंद्र फडणवीस राज्यासाठीचं आपलं व्हिजन कार्यक्रमात मांडतील.
Majha Maharashtra Majha Vision 2023: 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' लाईव्ह पाहा :
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह राज्यातले प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत, संजय राऊत यांची उपस्थिती असणार आहे.
Majha Maharashtra Majha Vision: महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत.
पार्श्वभूमी
Majha Maharashtra Majha Vision: महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह राज्यातले प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत, संजय राऊत यांची उपस्थिती असणार आहे.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' लाईव्ह पाहा :
एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व राजकीय नेते महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडणार आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तासंघर्ष झाला. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात न भुतो न भविष्यती असं सरकार सत्तेत आलं. शिंदे-फडणवीस सरकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचं सरकार.
राज्यात सध्या सत्तासंघर्षाचा पेच अनिर्णीतच आहे. सत्ता संघर्षासोबतच खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचं? हे मुद्देही सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. याभोवतीच सध्या राज्याचं राजकण फिरतंय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रासाठीचं राज्याचं व्हिजन मांडण्यासाठी राजकीय नेतेमंडळी आज एबीपी माझावर येणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -