मुंबई : महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजीनाम्याची मागणी बीडमधील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने केली आहे. विशेष म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत पुरावे घेऊन अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटूनही राजीनाम्याची मागणी करत चर्चा केली होती. त्यावेळी, मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील, असे उत्तर मुख्यमंत्र्‍यांनी दिले होते. मात्र, अद्यापही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यावरुन, आता अजित पवारांनी (Ajit pawar) केलेलं वक्तव्य चर्चेत असून राजकीय वर्तुळातून थेट अजित पवारांना लक्ष्य केलं जात आहे. धनंजय मुंडेंनीच राजीनाम्याचा निर्णय घ्याव, या अजित पवारांच्या वक्तव्यावर अंजली दमानिया, मंत्री संजय शिरसाट यांच्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला. अजित दादांची घुसमट होतेय, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.    


अजित पवार जे बोलतात ते खर आहे, त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. तेव्हा, तुम्ही राजीनामा देऊ नका असे बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांना सांगितलं होतं. महाराष्ट्राची परंपरा आहे, जेव्हा मोठे आरोप होतात आणि ज्यावेळी चौकशी लागते तेव्हा तो व्यक्ती सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडतो. सत्तेच्या सोबत राहिलेल्या माणसाला पोलिसांचं अभय मिळतं, त्यामुळे अजित पवारांनी तेव्हा घेतलेला निर्णय योग्य होता, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. 


अजित दादांची घुसमट झालीय


नैतिकता ही कोणी तुम्हाला शिकवावी लागत नाही, हे मनावर असतं. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना एक इशारा दिला की, मी राजीनामा दिला होता. समोरच्याने समजून घ्यायला हवा की आपला पक्षप्रमुख म्हणतोय की मी राजीनामा दिला होता, याचा अर्थ तू पण दे.. असेही आव्हाड यांनी म्हटले. अजितदादांची घुसमट झाली आहे, त्यांना सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. अजित दादा हताश होऊन बोलून गेले, अजितदादा बोलतात ते चांगलं नाही. अजित दादा यांचा हेल्पलेसनेस दाखवतोय की, ते कधी एवढे असहाय दिसत नाहीत. मात्र, अजित दादा धनंजय मुंडेंच्या बाबतीत हिंमत का दाखवत नाहीत, हे मला माहित नाही, असे म्हणत अजित पवार हेल्पलेसनेस झाल्याचं आव्हाड यांनी म्हटलं.  


सुरेश धस मुंडेंना भेटले हे अनाकलनीय


सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे साडेचार तास एकत्र बसतात हे खटकणारं आहे. कोणीही कोणाला भेटावं, मला धनंजय मुंडे रस्त्यावर भेटले तरी मी त्यांना बोलेल. पण, तुम्ही साडेचार तास चर्चा केल्यानंतर लोक संशयांनी बघणार, जो माणूस त्या व्यक्तीवर आरोप करतो, तो माणूस साडेचार तास भेटतो हे अनाकलनीय आहे. सुरेश धस म्हणतात की बातमी फुटली, पण तुम्ही भेटलात की नाही हे महत्त्वाचं आहे, तुम्ही मुंडेंना भेटला हचे महत्त्वाच आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावरही निशाणा साधला.  


हेही वाचा


धक्कादायक! ST कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना; महामंडळाकडून 4 महिन्यांपासून PF च जमा होईना