Majha Maharashtra Majha Vision : आरोपांना कामाने उत्तर देतो म्हणून दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायती मिळाल्या : एकनाथ शिंदे
Majha Maharashtra Majha Vision : आम्ही आरोपांना कामाने उत्तर देतो म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाल्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
CM Eknath Shinde Vision : "आम्ही आरोपांना कामाने उत्तर देतो म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाल्या. आमची तर इच्छा प्रामाणिक आहे मी जसं बोलतोय तुम्ही आरोप करा आम्ही कामाने उत्तर देऊ," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी आपलं व्हिजन मांडताना पायाभूत सुविधांबद्दल सरकार करत असलेले प्रयत्न याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसंच उद्योग, शेतकऱ्यांबद्दल सरकार काय करु पाहते तेही सांगितलं.
आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत आणि प्रत्येकाचे वेगवेगळ्या पक्ष असतील कोणी विरोधात असेल. परंतु आपण आपली जी काही महाराष्ट्राची संस्कृती आहे ती कधी सोडता कामा नये. आपण एक पातळी ठेवूनच कोणी बोललं पाहिजे. मी पातळी सोडून कधी बोलत नाही. मी त्यांना एकच सांगतो बाबा, मी एक कार्यकर्ता आहे. तुम्ही आरोप करत रहा मी काम करत आहे. आम्ही बघा आरोपाला कामाने उत्तर देतो म्हणून ग्रामपंचायतमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाल्या. मला अभिमान आहे याचा लोकांनी सपोर्ट केला आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
...म्हणून दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाल्या : मुख्यमंत्री
राजकीय पक्ष राजकीय पक्षांचे नेते परस्परांबद्दल ज्या पातळीवर जाऊन सध्या बोलताना दिसत आहेत, याचा परिणाम समाजावर राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या तरुण मुलांवर कायप्रकारे होत असेल असं विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "मी सांगतो मी आरोपांना कामाने उत्तर दिलं आहे. कायदा आणि एखाद्यावर मर्यादा किंवा बंधन घालून होणार नाही. प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण काय करतोय, आपण चांगलं, बोलतोय वाईट बोलतोय. लोकांना हे बिलकुल आवडत नाही. आम्ही बघा आरोपांना कामाने उत्तर देतो म्हणून ग्रामपंचायतमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाल्या. मला अभिमान आहे याचा लोकांनी सपोर्ट केला आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय, एकनाथ शिंदे म्हणाले...
तसंच उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे अशोक चव्हाणांकडे बघून हसले आणि म्हणाले, सांगू का?? सगळंच काही सांगायचं नसतं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन मांडलं. यावेळी त्यांनी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी नेत्यांचं व्हिजन
महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यानं पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत.