Majha Katta : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी लता दीदींसोबत अनेक गाणी गायली आहेत.  सुरेश वाडकर यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 


ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी त्यांच्या तरल आणि तलम आवाजाने संगीत विश्वावर गेली पाच दशकं आपला ठसा उमटवला आहे. 80-90 च्या दशकात सुरेश वाडकर यांनी मराठी सिनेमांमध्ये अनेक नायकांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तसेच हिंदी सिनेसृष्टीलाही सुरेश वाडकर यांनी आपल्या जादुई आवाजाने भूरळ घातली आहे. लतादीदींसोबत सुरेश वाडकरांनी गायलेली गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहेत.


'मेरी दुनिया उदास' या गाण्याच्या डबिंग दरम्यान लता दीदींसोबत मीदेखील उपस्थित होतो. त्यावेळेस ती रूम पेटली आहे असं वाटत होतं. लता दीदी 'मेरी दुनिया उदास' मधील 'उदास' अशाप्रकारे म्हणाल्या की मी त्या गाण्याचे शब्दच विसरलो, असे सुरेश वाडकर म्हणाले. 


लतादीदींकडे वयाच्या बाराव्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्यामुळे त्यांना जास्त रियाज करायला मिळाला नव्हता. तरी लता दीदी शास्त्रीय गाणी उत्तम गायच्या. दीदीचं गाणं म्हणजे पूर्णविराम असायचा. लता दीदी गाताना साक्षात्कार करून दाखवायच्या. कृष्णाचं विराटरूप मला त्यांच्या गाण्यात दिसायचं. लता दीदींचा मी खूप मोठा चाहता आहे, असंही सुरेश वाडकर माझा कट्ट्यावर म्हणाले. 


संबंधित बातम्या


Majha Katta : कोरोनाच्या संकटापेक्षाही अधिक भयानक आजची शिक्षणव्यवस्था, तिला पर्याय हवा; डॉ. अभय बंग यांचं मत


Kapil Dev on Majha Katta : कपिल देव यांनी सांगितला लग्नाच्या वेळचा हटके किस्सा


Arvind Kejriwal on Majha Katta : पंजाबच्या आगामी निवडणूकींच्या सर्व्हेत 'आप'चं पारडं जड का?, केजरीवालांनी स्वत: सांगितलं कारण


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha