Kapil Dev on Majha Katta : 1983 च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी 1983 च्या विश्वचषकाचा तो थरार, त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. देशाच्या ऐतिहासिक विजयाचा मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवासही त्यांनी उलगडून सांगितला आहे. एवढंच नाहीतर कपिल देव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से देखील सांगितले आहेत. यावेळी कपिल देव यांनी त्यांच्या लग्नाच्या वेळचा खास किस्सा देखील सांगितला आहे.
 
माझा कट्ट्यावर बोलताना कपिल देव यांनी एक हटके किस्सा सांगितला आहे. त्यांचं लग्न ठरवतानाचा हा किस्सा कपिल देव यांनी सांगितला. त्यावेळी क्रिकेट खेळणं याकडे करिअर म्हणून पाहिलं जात नव्हतं. ज्यावेळी कपिल देव यांचे लग्न ठरत होतं, त्यावेळी त्यांच्या पत्नी रोमी यांच्या घरी त्यांच्या आजोबांना देव यांच्याबाबत सांगितलं. त्यावेळी रोमी यांच्या आजोबांनी विचारलं की, मुलगा काय करतो. रोमी यांच्या वडिलांनी मुलगा क्रिकेट खेळतो असं सांगितलं. त्यावेळी आजोबा म्हणाले की, ते सर्व ठिक आहे पण कमावण्यासाठी काय करतो." असा भन्नाट किस्सा माझा कट्ट्यावर कपिल देव यांनी सांगितला आहे.


दरम्यान, 1983 च्या विश्वचषक विजयावरील सिनेमा '83'  नुकताच प्रदर्शित झाला. ज्यानंतर 1983 च्या त्या ऐतिहासिक विजयाचा आनंद आणि आठवणी भारतभर पसरु लागल्या आहेत. याच निमित्ताने या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार आणि भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी एबीपीच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यांनी काही आठवणीतले किस्से शेअर केले आहेत. हे सारे किस्से कपिल देव यांच्यासोबतच्या माझा कट्टामध्ये तुम्ही पाहू शकता. 1983 चा विश्वचषक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णक्षण म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. या विजयाने भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहराच जणू बदलला. अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवून इतिहास रचला होता. या विजयाच्या आठवणी आजही भारतीयांच्या मनात ताज्या आहेत. या सर्व आठवणींना भारताचे तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी उजाळा दिला.



महत्त्वाच्या बातम्या: