मुंबई: मुंबईत बसून कारखाना चालवायचा नाही असा निर्णय घेतल्यानंतर राहुल बजाज यांनी आपलं आयुष्य आकुर्डीतील कारखाना आणि कामगारांसोबत घालवलं. त्यांच्या निधनाने आपण एका मित्राला तर देश राष्ट्राचा विचार करणाऱ्या व्यक्तीला मुकला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे.
राहुल बजाज यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, राहुल बजाज यांनी पहिला निर्णय घेतला, तो म्हणजे मुंबईत बसून कारखाना चालवायचा नाही. त्यानंतर त्यांनी पुणे-पिंपरीत कामाला सुरुवात केली. राहुल बजाज हे एकमेव उद्योजक होते, ज्यांनी सबंध आयुष्य आकुर्डीतील कारखाना आणि कामगार यांच्यासोबत घालवलं. औरंगाबादला औद्योगिकरण वाढावं यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न होते. त्यावेळी राहुल बजाज यांनी फार मोठं योगदान दिलं. राज्य सरकार आणि राहुल बजाज यांनी मिळून सातारामध्येही छोटा कारखाना काढला होता.
स्वातंत्र्यानंतर देशाची उभारणी करण्यात काही उद्योजगांचा वाटा होता. जेआरडी टाटा, शंतनुराव किर्लोस्कर अशांच नाव घेता येईल. यानंतर दुसरी पिढी उद्योग क्षेत्रात पुढे आली. यामधे राहुल बजाज यांचं नाव घ्यावे लागेल. महात्मा गाधींशी वर्ध्यातील बजाज कुटुंबाचा संबंध आला. सुरुवातीस या बजाज कुटुंबाचा व्यवसाय कापसाच्या व्यापाराचा होता. मात्र पुढच्या पिढीने वेगळा मार्ग निवडला. राहुल बजाज यांची कारखानदारी पुण्यातून सुरु झाली असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले की, राहुल बजाज हे वेगळे उद्योजक होते, आपलं मत स्पष्ट मांडत होते. कधी सरकारचे मुद्दे पटले नाहीत तर त्यांनी स्पष्ट मांडले. राहुल बजाज यांनी निवडेल त्या क्षेत्रात त्यांनी कर्तृत्व दाखवलं. स्पष्ट भूमिकेमुळे राष्ट्रीय पातळीवर उद्योग वाढवण्यासाठी मदत झाली. राहुल बजाज यांना राज्यसभेवर पाठवताना महाराष्ट्रातील पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिला. त्यांना खासदार म्हणून अल्पकाळ मिळाला, पण राज्यसभेत त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे प्रश्न मांडले. राहुल बजाज आज बोलणार म्हटल्यानंतर सभागृहात पूर्ण सभासदांची उपस्थिती होती, त्यांचं भाषण सेंट जॉर्ज स्टाईने ऐकायचे.
मी एक मित्र गमावला
व्यक्तीगत आमचा मैत्रीचा ओलावा होता, त्यांचा मला पाठिंबा होता.. व्यक्तीश: आमचा मैत्रीचा ओलावा होता असं सांगताना शरद पवार म्हणाले की, गेली काही दिवस त्यांची प्रकृती ठिक नाही हे मला ठाऊक होतं. गेल्या दोन तीन दिवसात जी काही माहिती मिळत होती, ती चिंताजनक होती, आजच्या या बातमीने दुर्दैवाने ते सत्य निघालं. आज ते आपल्यात राहिले नाहीत. व्यक्तीश: सलोख्याला मुकलो, या देशाच्या उद्योजकाला, राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या उद्योजकाला देश मुकला.
संबंधित बातम्या:
- Rahul Bajaj Passes Away: 'हमारा बजाज' हरपला, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन
- Rahul Bajaj Passes Away : बजाज चेतक बनली होती प्रत्येक घराची शान, राहुल बजाज यांनी तयार केली होती खास स्कूटर
- Rahul Bajaj: भारताने उद्योगपती, दीपस्तंभ अन् 'हमारा बजाज' गमावला; राहुल बजाज यांच्या निधनावर शरद पवारांची प्रतिक्रिया