एक्स्प्लोर

Majha Katta : मविआ धर्म पाळत विशाल पाटील यांचा प्रचार कसा केला? विश्वजित कदम यांनी माझा कट्ट्यावर उघड केलं गुपित

Majha Katta Vishal Patil and Vishwajeet Kadam : महाविकास आघाडी धर्म पाळत विश्वजित कदम यांनी अपक्ष विशाल पाटील यांचा प्रचार नेमका कसा केला, याचा खुलासा त्यांनी माझा कट्ट्यावर केला आहे.

सांगली : महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha Election 2024) ठाकरे गटाच्या (Thackeray Group) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे काँग्रेस नाराज होती, मात्र, आघाडी धर्म पाळणं ही गरजेचं होतं. असं असताना काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांचा प्रचार केला. पण, विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी अपक्ष विशाल पाटील यांचा प्रचार नेमका कसा केला? याचं उत्तर त्यांनी माझा कट्टा (Majha Katta) या एबीपी माझाच्या खास कार्यक्रमात सांगितलं. विश्वजित कदम यांनी रात्रीच्या वेळी प्रचार केल्याचं आणि कार्यकर्त्यांच्या शिस्तीबद्दल सांगितलं.

मविआ धर्म पाळत विशाल पाटील यांचा प्रचार कसा केला? 

यंदाची लोकसभा निवडणूक फारच खास ठरली. त्यातच सर्वाधिक चर्चा झाली ती, सांगली मतदारसंघाची. सांगली मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती. अखेर वरिष्ठांच्या बैठकीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आणि ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसही जागा सोडण्यास तयार नव्हतं. पण, ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि संपूर्ण समीकरणच बदललं. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेची निवडणूक लाख मतांहून अधिक मताधिक्क्यानं जिंकली. या निवडणुकीत त्यांना आमदार विश्वजित कदम यांनी विजयासाठी मदत केली.

विश्वजित कदम यांनी माझा कट्ट्यावर उघड केलं गुपित

माझा कट्ट्यावर विश्वजित कदम यांनी सांगितलं की, मी 20 दिवस रात्री 9 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत झोपलेलो नाही. आमच्याकडे शिस्त आणि संघटन आहे. यावर विशाल पाटील यांनी सांगितलं की, आमच्याकडे शिस्त आणि संघटन खूप स्ट्राँग आहे. आमच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघापैकी त्यांच्या (विश्वजित कदम यांच्या) मतदारसंघातील म्हणजे माझ्या लाखांच्या मतांच्या लीडमधली 36,000 मते मला जिथे मिळाले, त्या स्पेसिफिक मतदारसंघांत त्यांचं नेटवर्कींग खूप चांगलं आणि स्ट्राँग आहे. कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि ते त्यांच्यासाठी खूप कमिटेड आहेत. 

विशाल पाटील यांनी पलूस-कडेगावमध्ये प्रचार का केला नाही?

विशाल पाटील पुढे म्हणाले की, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते निरोपाची वाट पाहतात आणि त्यांची एक यंत्रणा आहे, ज्यातून ते निरोप जातात. त्यांची हायराकी आहे की, कुणी कुणाला निरोप द्यायचा, ती हायराकी मोडून आपण आत शिरु शकत नाही. ती खूपच शिस्तबद्धस कमिटेड लोकं आहेत आणि खूप प्रेम करणारी लोकं आहेत. अगदी अडचणीच्या काळात मोहनशेठ दादा, त्यांचे चिरंजीव, नातू, त्यांचे मेहुणे असतील, त्यांची बांधिलकी आहे. त्यामुळे येथे प्रचाराची गरज नाही. म्हणूनच मी पलूस-कडेगावमध्ये प्रचारासाठी गेलेलो नाही. मी इतर पाच विधानसभा मतदारसंघांकडे लक्ष दिलं. कारण इथे काय करायची गरज नाही. काय ते आणतील नायतर पाडतील, त्यांच्या हातात आहे, आपण इकडे बघायची गरज नाही. त्यामुळे तिथे जाण्याची गरज नाही, हे माहित होतं, असं विशाल पाटील यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ : विशाल पाटील आणि विश्वजित कदम माझा कट्ट्यावर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget