Majha Katta : जागतिक बाजारात ज्या पिकांना मागणी ती पिके घ्या, विलास शिंदेंचा शेतकऱ्यांना सल्ला
जागतिक बाजारात ज्या पिकांना मागणी आहे, अशीच पिके शेतकऱ्यांनी घ्यावी. शेतकऱ्यांनी पुढचा विचार करुन चालले पाहिजे, असे मत सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी व्यक्त केले.
Majha Katta : पुढच्या काळात आम्हाला आमचा स्वत: ब्रॅन्ड तयार करायचा आहे. अमूलसारखे सह्याद्रीचे ब्रॅन्ड करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे कृषी उद्योजक आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे यांनी सांगितले. जागतिक बाजारात ज्या पिकांना मागणी आहे, अशीच पिके शेतकऱ्यांनी घ्यावी. शेतकऱ्यांनी पुढचा विचार करुन चालले पाहिजे. हेल्दी प्रोडक्टवर भर द्या असेही त्यांनी सांगितले. फळे, भाजीपाला याकडे शेतकऱ्यांना वळावे लागेल असे शिंदे यावेळी म्हणाले. विलास शिंदे हे 'माझा कट्ट्यावर' उपस्थित होते. यावेळी त्यांनी माहिती दिली.
सह्याद्री सारख्या फार्म कंपन्या उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होणं गरजेचं आहे. संघटीत झाल्याशिवाय हे शक्य नसल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. संघटीत झाले तर बदल नक्कीच होऊ शकतो. जागतिक बाजारात ज्या पिकांना मागणी आहे अशीच पिके घ्यावी. शेतकऱ्यांनी पुढचा विचार करुन चालले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी कोरडे वातावरण आहे. पाऊस कमी आहे त्याठिकाणी फळबागा चांगल्या येतात. सोलापूर, सांगलीचा पूर्वेकडचा भाग त्याठिकाणी चांगले वातावरण आहे, त्याठिकाणी द्राक्षाची क्वालिटी चांगली आहे. नाशिकच्या तुलनेत ते शेतकरी पुढे आहेत. पण नाशिकचे शेतकरी जिद्दी आहेत, चिकट आहेत. निसर्गाच्या विरोधात जाऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी काम करतात असे विलास शिंदे यांनी सांगितले. वातावरण तिकडे चांगले असले तरी नाशिकमधून सर्वात जास्त द्राक्ष निर्यात होत असल्याचे ते म्हणाले. राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना शहरात जावे असे वाटते. घरी जमिन असतानाही त्यांना असे वाटते. पण पुढच्या काळात सरकारी यंत्रणा असेल इतर क्षेत्रात नोकऱ्या तयार होण्याची किती संधी आहे हे पाहिले पाहिजे. खूप कमी संधी आहेत. प्रत्येत क्षेत्रात अडचणी आहेत. शेतीत सुद्धा संधी शोधल्या पाहिजेत. शेतीतही आपण करिअर करु शकतो असे विलास शिंदे यांनी सांगितले.
जगातील 42 देशात सह्याद्रीचा ब्रॅन्ड पोहोचवला आहे. द्राक्ष, केळी आणि डाळिंब ही फळे आता 42 देशांमध्ये जात आहेत. तसेच पक्रिया केलेल्या वस्तू देखील या 42 देशांमध्ये जात असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. जे करायचे ते दर्जेदार करायचे असे आम्ही सुरुवातीपासूनच ठरवले होते. तसेच सह्याद्री फार्मच्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंग सेंटर देखील सुरु केले आहे. त्यामाध्यमातून आम्ही ग्रामीण भागात कोणकोणत्या शेतीत संधी आहे. त्यासाठी लागणारे बेसिक स्कील देण्याचे काम आम्ही करत असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले.