एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Majha Katta : तेव्हा शरद पवारांनी आणि आता अजित पवारांनी चुकीचं केले - पन्नालाल सुराणा

समाजसेवा आणि समाजसुधारणा यांना आयुषाचा श्वास आणि ध्यास मानलेले जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांची माझा कट्टावर मुलाखत घेण्यात आली.

Majha Katta :  समाजसेवा आणि समाजसुधारणा यांना आयुषाचा श्वास आणि ध्यास मानलेले जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांची माझा कट्टावर मुलाखत घेण्यात आली. नुकताच त्यांनी ९० वा वाढदिवस साजरा केला.. सत्तर वर्ष ते देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाच्या स्थितंतराचे साक्षीदार राहिले आहेत. चले जाव आंदोलनपासानू ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीतील महत्वाचा अनुभव सुराणा यांच्याकडे आहे.  पन्नालाल सुराणा यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता.. त्यासोबतच त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक अनुभवाबद्दल कट्ट्यावर दिलखुलास गप्पा मारल्या...

जुना समाजवादी पक्ष, जनतापक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचं सामाजिक कामही मोठं आहे. मराठवाड्यात भुकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी पन्नालाल यांनी सुरु केलेल्या आपलं घर मधून अनेक मुला-मुलींची आयुष्य घडली आहेत. त्याशिवाय भूमीहीन शेतकऱ्यांना जमीनी मिळवून देण्यासाठीही त्यांनी संघर्ष केला. समाजकारण आणि राजकारणामध्ये गुंतलेल्या व्यक्तीमध्ये लेखकही दडला आहे. ग्यानबाचं अर्थकारण हे त्यांचं पुस्तक अनेकांना प्रेरणा देणारं ठरलेय.

पन्नालाल सुराणा यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, सोव्हिएत संघटनेच्या विघटनानंतर विचारसणीचा काही उपयोग नाही, असे जगभरात वातावरण निर्माण करण्यात आले. पण जगामध्ये जी विषमता आहे, अन्याय होतोय, यामध्ये अनेकांचं जिवन खडतर होतोय, त्यामुळे विाचरसणीच्या आधारावर त्यांच्या सुखासाठी प्रयत्न करावे लागतात.. आम्ही वयाच्या नवव्या वर्षांपासून यासाठी मेहनत घेतोय. 

समाजवादी चळवळ सध्या विस्कटली आहे. वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे समाजवादी चळवळ विस्कटली. काँग्रेसच्या बाहेर पडू नये असे अच्युतराव पटवर्धन यांचं मत होते, पण अशोक मेहता यांच्या आग्रहामुळे काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तेथूनच मतभेदाची सुरुवात झाली.  १९५२ च्या निवडणुकीत बसलेल्या फटक्याचा सर्वात जास्त परिणाम समाजवादी पक्षाला झाला.  काही जणांन राजकारण सोडले, तर काही जणांनी वेगळी चूल मांडली.

जनसंघासोबत वैचारिक मतभेद असतानाही काही जणांना त्यांच्यासोबत काम केले अन् काँग्रेस हटावचा नारा दिला. पण पूर्णपणे विचार न केल्याचा फटका बसला. ७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली, त्यावेळी जयप्रकाश यांच्या नेतृत्वात मोठा लढा देण्यात आला. बाहेरच्या दडपणामुळे इंदिरा गांधी यांन देशाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेणार हे माहित होते. त्यामुळे सर्वांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. जयप्रकाश यांनी दूरचा विचार केला नाही. सामान्य कार्यकर्त्यांना जनसंघासोबत युती करायच नव्हती, पण काही नेत्यांनी जनसंघासोबत जायचा निर्णय घेतला. त्यामुळे सामाजिक चळवळ विस्कळीत झाली. दरम्यान,  सेवादलचं अध्यक्षपद आणि मराठवाडा वृर्तमानपत्राचे संपादकपद असल्यामुले मी राज्यपालपद नाकारले होते, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

शरद पवार यांचं पुलोद सरकार कसे सत्तेत आले? त्यावेळची आणि आताच्या परिस्थितीविषयी काय वाटतेय.. याबाबत बोलताना पन्नालाल सुराणा म्हणाले की, शरद पवार जेव्हा बंडखोरी करण्याचा विचार करत होते, तेव्हा गोविंद तळवळलकर यांच्याकडे शरद पवारांचा निरोप गेला. काही नेत्यांशी बोलायला सांगितलं. शरद पवार आणि तळवळलकर यांचे घनिष्ठ संबंध होते.  तळवळलकरांनी शरद पवार यांची एमएम जोशी आणि काही नेत्यांशी बैठक ठरवली. त्यावेळी पक्षाचं नुकसान होईल, असे मी ठरवलं होतं. पक्षाची इमेज पाळली पाहिजे, आपल्यामुळे पक्षाचं नुकसान झालं नाही पाहिजे. जनता पक्षातील नेते सत्तेवर जायल फार उत्सुक असतात. संधी मिळतेय तर जाऊयात असे त्यांचं मत होते. पक्षाने निर्णय घेतल्यानंतर त्याचं समर्थन करायलाच हवं. त्यावेळी मला तो प्रयोग चांगला वाटला नव्हता.  आताही माझी भूमिका तशीच आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी खुनशीपणा केला. त्यावेळालाही चुकीचं झाले होतं आणि आजही चुकीचेचं झाले आहे. मुख्यमंत्री होणार हे ठरल्यानंतरच शरद पवार हे बाहेर पडले होते. त्या परिस्थित जनता पार्टीकडे मुख्यमंत्री सांभाळू शकेल असा नेत नव्हता, त्यामुळे एसएम जोशींनी शरद पवारांना पाठिंबा द्यायचा ठरवला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Embed widget