Maharashtra Politics:  महाराष्ट्राच्या (Mahrashtra) राजकारणात मागील काही दिवसांमध्ये मोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत. तर हे  भूकंपाचे धक्के अजूनही ही कायम राहण्याची शक्यता आहे. आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीचे देखील काही आमदार फुटल्यानंतर सत्तेमध्ये सामील झाले आहे. पण यानंतर आता काँग्रेसच्या (Congress) फुटीच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे आता या महानाट्याचा पुढचा अंक काँग्रेच्या दारात तर नाही होणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 


नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 


अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेक बदल होत गेले. पण आता काँग्रेसदेखील या फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाल्याने काँग्रेस आता विरोधी पक्षनेता पदावर दावा सांगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस देखील दोन गटात विभागलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. 


गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण येत आहे. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यामधील वादावर देखील मागील काळात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षात सगळं अलबेल आहे ना हा सवाल देखील तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. तर काँग्रेसच्या फुटीच्या चर्चा या काही पहिल्यांदा नाही असं विधान आमदार बच्चू कडू यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. तर त्यांनी काँग्रेसला उद्देशून महाविकास आघीडीचे 10 ते 15 आमदार फुटतील असा दावा देखील त्यांनी केला होता. 


पण सत्तेत आता अजित पवारांच्या सहभागामुळे अनेक समीकरणं बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोण कोणासोबत जाईल हो कोणालाही सांगता येणार नाही असं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात आहे. यावर बोलतांना भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं की, राज्याच्या राजकारणात सध्या काय होतंय हे भल्याभल्यांना कळत नाही. कालपर्यंत विरोधकात बसून ज्यांनी भाजपवर आगपाखड केली तेच नेते आज स्तुतीसुमने उधळताना दिसत आहेत.
त्यामुळे काँग्रेसचे नेमकं काय होणार हे येणारा काळ सांगेल. त्यामुळे आता काँग्रेस पक्षामध्ये तर पुढचा भूकंप नाही होणार ना असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे. 


हे ही वाचा : 


Sharad Pawar : माझ्या विचाराशी गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, शरद पवारांची अजित पवारांना तंबी