Amarnath Yatra : देव तारी त्याला कोण मारी या वाक्याचा प्रत्यय धुळे शहरातील अमरनाथ येथे यात्रेसाठी गेलेल्या भाविकांना आला. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया या भाविकांनी व्यक्त केली आहे. या भाविकांनी त्यांनी अनुभवलेल्या कठीण प्रसंगाबाबत देखील सांगितले. 


अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेत 15 भाविकांचा मृत्यू तर 50 भाविक जखमी


अमरनाथ येथे झालेल्या ढगफुटी दुर्घटनेत 15 भाविकांचा मृत्यू तर 50 भाविक जखमी झाले आहेत, तर 40 हून अधिक भाविक बेपत्ता झाले आहेत. धुळे शहरातील प्रवीण अग्रवाल हे त्यांच्या मित्र परिवारासह अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे स्वीय सहाय्यक शांताराम पाटील, डॉक्टर पंकज पाटील, जगदीश राणा, धीरज परदेशी, हितेश अरोरा हे देखील होते. तसेच साक्री रोडवरील 15 ते 20 तरुण देखील या यात्रेसाठी गेले होते,


आमचे दैव बलवत्तर होते म्हणून..


प्रवीण अग्रवाल हे त्यांच्या मित्र परिवारासह दर्शन घेण्यासाठी गेले असताना त्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये ठेवल्या होत्या. यावेळी या ठिकाणी असणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना तिथून लवकर निघून जाण्याची बाबत सांगितले, प्रवीण अग्रवाल हे त्यांच्या मित्रपरिवारासह अवघ्या काही वेळातच तिथून बाहेर पडल्यानंतर ही ढगफुटीची घटना घडली, धुळ्यातील हे भाविक दर्शन घेऊन गुहेच्या बाहेर आल्यानंतर अचानक मोठा आवाज होऊन ढगफुटी झाली. अमरनाथ बाबाच्या गुहेच्या उजव्या बाजूला डोंगरावरून पाण्याचा मोठा वेगवान प्रवाह आला. सोबत डोंगर खचल्याने मातीचा देखील मोठा लोंढा समोर आला. त्यात 25 तंबू आणि दोन ते तीन लंगर तसेच पन्नास हून अधिक भाविक पाण्यात वाहून जाताना या भाविकांनी प्रत्यक्ष पाहिले. यानंतर आम्ही सर्वजण धावत सुरक्षितस्थळी पोहोचलो. त्यानंतर संपूर्ण परिसर पावसाने जलमय झाला होता, मात्र त्यांचे दैव बलवत्तर होते, म्हणून ते वाचलो अशी प्रतिक्रिया प्रवीण अग्रवाल यांनी व्यक्त केली.


15,000 हून भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले


ही घटना घडताच प्रशासनाकडून वेळीच मदत कार्य सुरू करण्यात आले, त्यामुळे जवळपास या ठिकाणी असलेल्या 15,000 हून भाविकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले, तर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र या ठिकाणी घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवीण अग्रवाल यांनी केली आहे.


संबंधित बातम्या


Amarnath Yatra : अमरनाथजवळ सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अडकला, यात्रा आजही स्थगित; रेस्क्यू ऑपरेशन सुरु


Amarnath Yatra : पुण्यातील दोघांचा मृत्यू, तीन जिल्ह्यातील 111 भाविक सुखरुप