Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरात महत्वपूर्ण घोषणा केली आहे. नागपुरातून लवकरच काही महत्वाच्या शहरापर्यंत 140 किलोमीटर ताशी वेगाने ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे, या प्रकल्पाला रेल्वे बोर्डाची देखील मंजुरी मिळाल्याचं गडकरी म्हणाले आहेत. ते नागपूरमध्ये काही विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.


140 किलोमीटर प्रति तासाने ब्रॉडगेज मेट्रो


नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती अकोला, नागपूर ते बैतुल नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते रामटेक या मार्गावर 140 किलोमीटर प्रति तासाने ब्रॉडगेज मेट्रो चालावी हे आमचं स्वप्न होत, गडकरी पुढे म्हणाले की, रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पुढच्या आठवड्यात दिल्लीला मेट्रो आणि रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे अशी माहिती ही त्यांनी दिली. 


ड्रीम प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होणार
पुढच्या आठवड्यात दिल्लीला मेट्रो आणि रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे अशी माहिती ही त्यांनी दिली. तसेच लोकशाही ही 4 स्तंभावर उभी आहे. त्यामधील न्यायव्यवस्था अतिशय बळकट, दर्जेदार असणे लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. लोकशाहीतील प्रत्येक घटक दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी काल नागपुरात सांगितले.


विधि विद्यापीठासाठी विशेष थांबा


नागपूर आता 'एज्युकेशन हब' बनत आहे. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या येत आहेत. बुटीबोरी ते कन्हान हा मेट्रो मार्ग सुरु होणार आहे. या मार्गावर विधि विद्यापीठासाठी विशेष थांबा तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. दरम्यान, नागपूर येथील बुटीबोरी परिसरातील वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या परिसरात काल आयोजित या सोहळ्यात रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांच्याहस्ते मुलामुलींच्या वेगवेगळ्या वसतिगृहाचे व सुविधा केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस.नरसिम्हा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनिल शुक्रे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांसह मान्यवर उपस्थित होते.