एक्स्प्लोर

निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण तटकरेंचा कुठेच लवलेश असणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल

मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न देता स्वतःच्याच पदरात सगळंच पाडून घेण्याची नेहमीची सुनील तटकरे यांची सवय असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली.

Mahendra Dalvi on Sunil Tatkare : मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न देता स्वतःच्याच पदरात सगळंच पाडून घेण्याची नेहमीची सुनील तटकरे यांची सवय असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली. ज्यांना मालकत्व होता आलेलं नाही त्यांनी रायगडचे पालकत्व स्वीकारु नये, असेही दळवी म्हणाले. आगामी काळातील निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत. परंतू, सुनील तटकरे सारख्या महाभागाचा कुठेच लवलेश असणार नाही असंही दळवी म्हणाले.  

ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी रायगडचे  पालकत्व स्वीकारू नये 

सुनील तटकरे यांनी केलेल्या भरत गोगावले यांच्या नॅपकिन नकलीचा शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी यांनी समाचार घेतला. सगळं काही मलाच पाहिजे नेहमी आपल्याच पदरात पाडून घेण्याची सुनील तटकरे यांची नेहमीची सवय आहे. त्यामुळं ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी रायगडचे  पालकत्व स्वीकारू नये असा टोला अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आज महाड येथील मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांना लगावला. तुम्ही मालकत्व स्वीकारलं आणि ते साध्य करून दाखवलत तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे असा सुद्धा खरमरित टोला त्यांनी सुनील तटकरे यांना लागावला.

आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढणार 

सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिनची करून दाखवलेली नक्कल ही खांद्यावर घेऊन दाखवली. परंतू, गोगावले हे खांद्यावर नॅपकिन घेत नसून ते काखेत घेतात. खांद्यावर वाईट प्रसंगात नॅपकिन घेतली जाते असा टोला त्यांनी तटकरेंना लागावला. आम्ही लोकसभेत सुनील तटकरे यांच्यासाठी तन-मन-धन बाजूला ठेवून काम केलं. परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर त्यांची जात दाखवून दिली. मात्र आता आम्ही याला सडेतोड उत्तर देत आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. पण या महाभागाचा कुठेच लवलेश असणार नाही असा संताप त्यांनी तटकरे विरुद्ध व्यक्त केला.

गेल्या अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कोण पालकमंत्री होणार याची चर्चा सुरु आहे. सुरुवातील आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिले होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केल्यामुळं पुन्हा रायगडचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
Nashik TCS Case Nida Khan: मोठी बातमी: निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टात आज नेमकं काय घडलं?
निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टात आज नेमकं काय घडलं?
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Embed widget