Mahashivratri 2023 Live Updates : महाशिरात्रीनिमित्त शेगावात 12 ज्योतिर्लिंगांचे प्रदर्शन, भाविकांची मोठी गर्दी
Mahashivratri 2023 Live Updates : आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह आहे. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त आज मनोभावे पूजा करतात.

Background
Mahashivratri 2023 Live Updates : आज राज्यासह देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असणार आहे. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त मनोभावे पूजा करून यादिवशी उपवास करतात. महाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख संपत्ती धन लाभते असे सांगितले जाते. आज देशभरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते.
बुलढाणा जिल्ह्यातील पळशी इथं मोठी यात्रा
आज बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाली येथे महाशिवरत्रीनिमित्त आज श्री. शंकरगिरी महाराज महादेव मंदिरात मोठी यात्रा भरते. याठिकाणी सव्वा क्विंटलचा अनोखा रोडगा बनविण्याची 350 वर्षापासूनची प्रथा आहे. गव्हाचं पीठ, ड्राय फ्रूट , दूध इत्यादी पदार्थांपासून बनविण्यात आलेल्या या मोठ्या रोडग्याला जमिनीत गाडून आग न लावता भाजतात व दुसऱ्या दिवशी या रोडग्याचा महाप्रसाद भाविकांना दिल्या जातो. हा रोडगा बनविताना बघण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी येतात. ही 350 वर्षांपासूनची परंपरा कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून खंडित झाली होती. त्यामुळे यावेळी या यात्रेत मोठी गर्दी उसळेल.
त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी होणार
महाशिवरात्री निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार आहे, आज रात्रभर मंदिर भाविकांसाठी खुले रहाणार सकाळ पासून गर्दी वाढणार. महाशिवरात्री निमित्ताने उद्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई ची यात्रा होत असते. यावेळी संत मुक्ताई मंदिर ते चांगदेव मंदिर अशी पालखी काढण्याची परंपरा आहे. लाखो भाविक या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात
महाशिवरात्री निमित्ताने अहमदनगरच्या डोंगरगण येथे महादेव मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते. हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या मंदिराच्या बाजूलाच सीता मातेचे स्नानगृह आहे. वनवासाच्या काळात श्रीरामांनी सीता मातेसाठी बाण मारून इथे स्नानगृह बनविल्याची आख्यायिका आहे. तिथेही भाविक गर्दी करत असतात.
महाशिवरात्रीनिमित्त बीड येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात मोठी गर्दी होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात मोठी गर्दी होत आहे.. महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून आणि राज्या बाहेरून सुद्धा भाविक परळी मध्ये येत आहेत रात्रीपासूनच दर्शनासाठी लोक रांगेमध्ये लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Mahashivratri 2023 : शिर्डी साईप्रसादलयात भक्तांसाठी महाशिवरात्रीनिमित्त साडे पाच टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी साबुदाणा खिचडी आणि झिरकचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीच्या साईप्रसादालयात तब्बल साडेपाच हजार किलो साबुदाणा वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली आहे. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र या दोन दिवशी साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात येत असतो. आज खिचडी सोबतच शेंगदाणा झिरकसुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आला आहे. महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या साई भक्तांना असणारा उपवास लक्षात घेता साई संस्थानाकडून ही जय्यत तयारी करण्यात आली असून आज दिवसभरात जवळपास 50 ते 60 हजार भाविक साईप्रसादाला येतील अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादालयात हा साडेपाच हजार किलोंचा साबुदाणा वापरून खिचडी तयार करण्यात आली आहे. आज साईबाबांच्या समाधीवर सुद्धा याच खिचडीचा प्रसाद दाखवण्यात येतो.
Mahashivratri 2023 : महाशिरात्रीनिमित्त शेगावात अनोखं 12 ज्योति्लिंगांच प्रदर्शन, भाविकांची मोठी गर्दी
Mahashivratri 2023 : आज महाशिरात्रीनिमित्त शेगाव शहरात प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यलयाच्या माध्यमातून बारा ज्योति्लिंगांच प्रदर्शन आयोजित करण्यात आल आहे. महाशिरात्रीनिमित्त एकाच ठिकाणी बारा ज्योति्लिंगांच दर्शन होत असल्याने या प्रदर्शनाला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. बारा ज्योति्लिंगांच दर्शन घेऊन याठिकाणी ध्यान केंद्र उभारण्यात आल आहे ,भाविक ध्यान केंद्रात भेट देऊन मोठा आनंद घेताना दिसत आहे.























