नाशिक : नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालय चक्क सिनेमाच्या शूटींगसाठी परवानगी देण्यात आल्याचं समजत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशन ही केलं आहे. याचे फोटो आता समोर आले आहेत.


नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयात सिनेमाच्या शूटींगसाठी परवानगी देण्यात आली. याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशनही केलं आहे. यावेळी शूटींग बघण्यात कर्मचारी व्यस्त होते त्यामुळे रुग्णांचे हाल झालेले पाहायला मिळाले. शूटींग दरम्यान रुग्णालयातच दारूची पार्टी रंगल्यानं एकच खळबळ माजली आहे.


झाकीर हुसने रुग्णलायत द इन्व्हेस्टिंगेटर या चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच दारू पार्टी रंगली. रूग्णांना त्रास होणार नाही अशा अटीशर्ती घालून चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली.  त्यामुळे रात्रीचा स्टाफ चित्रीकरण बघण्यात व्यस्त होता तर चार ते पाच जण दारूच्या नशेत धिंगाणा घालण्यात दंग असल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा आहे. या आधीही झाकीर हुसेन रुग्णलायत दारू पार्टी रंगल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यानं आशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप होत आहे.


सुरक्षा रक्षकासह काही कर्मचाऱ्यांनी दारू दारू पार्टी केल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळाली आहे.  त्यामुळे रुग्णल्यातील cctv तपासून, रात्रीच्या स्टाफचा जाब जबाब घेऊन दोषींवर निलंबनाची करावाई केली जाणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणला परवानगी दिल्यानं चर्चेत आलेल्या रुग्णलायतच आता इन्व्हेस्टिंगेशन करावे लागणार आहे


नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र मुंबईत महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असणाऱ्या रमेश पवार यांच्या हाती आहेत. पवार सध्या मनपाच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत मात्र त्यांचा आढावा कधी पूर्ण होणार अॅक्शन मोडवर कधी येणार,  भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी करावाई कधी करणार याकडं लक्ष लागलंय.


महत्त्वाच्या बातम्या :