Onion Prices Drop : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण, विविध संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी कांद्याचे पिक चांगले आणले आहे. मात्र, सध्या बाजारपेठेत कांद्याला चांगला दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कांद्याला बाजारात प्रति क्विंटलला 200 ते 300 रुपयांचा दर मिळत आहे. दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.




 
बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांनी कांद्याचे चांगले उत्पन्न घेतले आहे. मात्र, भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा उत्पादन करायला शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा खर्च आला आहे. मात्र, जेव्हा शेतातील कांदा बाहेर बाजारात विक्रीसाठी नेला तेव्हा मात्र कांद्याला भाव फक्त 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी  कांदा उत्पादन करण्यासाठी जेवढा खर्च लावला तेवढाही निघणे कठीण झाले आहे. बाकी मेहनत घेतली ती वेगळीच. कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.  सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पडून आहे.  सध्या वातावरण देखील बदल होत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस, त्यामुळे शेतातील कांदा खराब होण्याच्या परिस्थितीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात धास्ती वाढली आहे. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.  त्यामुळे प्रशासनाने कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी व भाव निश्चित करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.




सध्या कांद्याला मिळणारा दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. कांद्याला कमी दर मिळत असल्याने आमच्या डोळ्यात पाणी आल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्याने सांगितले. सध्या कांद्याला 300 ते 500 रुपये क्विंटला दर मिळत आहे. हा दर परवड नाही. हा खूप कमी दर आहे. सुरुवातीला कांद्याला 2 हजार रुपयांपर्यंत होता. पण सरकारच्या निष्काळजीपणामुळे कांद्याला दर मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जय जवान जय किसान असा नारा देऊन चालणार नाही. स्वामिनाथन आयोग लागू करावा.  तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट भाव मिळतील अशी घोषणा केली होती, परंतू असे काही होताना दिसत नाही. त्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांना अच्छे दिन आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: