अशोक चव्हाणांना शिंदे-फडणवीसांचं दुसरं गिफ्ट, साखर कारखान्यासाठी 150 कोटी थकहमी, हर्षवर्धन पाटील, महाडिक, कल्याण काळेंसह 11 जणांवर मेहरबान!
कतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून (Maharastra State Co-Op Bank ) थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे.
Sugar Factory : सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार (maharashtra government) मेहरबान आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून (Maharastra State Co-Op Bank ) थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. याचसोबत अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांना देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे.
सध्या काँग्रेस मध्ये असलेले आणि भाजपला सातत्यानं मदत होईल अशी भुमिका घेणारे धनाजीराव साठे यांच्या संत कुर्मदास सहकरी कारखान्याला 59.49 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रिय सहकारी विकास निगमचा माध्यमातुन भाजप नेत्यांच्या कारखान्यांना जीवदान दिल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देत जीवदान दिले. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे का? असा प्रश्न राहिला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखाने कोणते ?
1) भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लक्ष्मी नगर नांदेड - 147.79 कोटी
व्यवस्थापन- अशोक चव्हाण
2) संत कुरुमदास सहकारी कारखाना पडसाळी सोलापूर - 59.49 कोटी
व्यवस्थापन - धनाजीराव साठे
3) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवणी पंढरपूर- 146.32 कोटी रुपये
व्यवस्थापन - कल्याणराव काळे
4) छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूर- 128 कोटी रुपये
व्यवस्थापन- प्रशांत काटे
5) जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर, गेवराई, बीड- 150 कोटी रुपये
व्यवस्थापन - अमरसिंह पंडित
एनसीडीसी मार्फत जीवदान मिळालेले भाजप नेत्यांचे कारखाने
1) शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर माळशिरस- 113.42 कोटी
व्यवस्थापन - विजयसिंह मोहिते पाटील
2) कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना महात्मा फुले नगर इंदापूर- 150 कोटी रुपये
व्यवस्थापन - हर्षवर्धन पाटील
3) निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर, रेडा इंदापूर- 75 कोटी रुपये
व्यवस्थापन- हर्षवर्धन पाटील
4) शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, लातूर- 50 कोटी रुपये
व्यवस्थापन- अभिमन्यू पवार
5) रामेश्वर सहकारी साखर कारखाना रावसाहेब नगर, जालना- 34.74 कोटी रुपये
व्यवस्थापन- रावसाहेब दानवे
6) भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर, सोलापूर- 126.38 कोटी रूपये
व्यवस्थापन- धनंजय महाडिक