बीड जाळपोळ कटाचा मास्टरमाईंड शोधा, संदीप क्षीरसागरांच्या मागणीनंतर फडणवीस आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी
अंतरवाली सराटीत पोलिसांनी कारवाई केली तेव्हा मोठमोठे नेते पोलिसांना टार्गेट करत होते याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं.
बीड : बीडमध्ये (Beed) आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणी आज विधानसभेत चर्चा झाली. या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधून काढा आणि न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. या प्रकरणात एसआयटी (SIT) का स्थापन झाली नाही? असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला, त्यावर सभागृहाची इच्छा असेल तर दोन दिवसांत एसआयटी स्थापन करू, असं फडणवीस म्हणाले. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही हा आरोप मात्र त्यांनी फेटाळला. बीडमध्ये पोलिसांवर आरोप केले जात आहेत. मात्र अंतरवाली सराटीत पोलिसांनी कारवाई केली तेव्हा मोठमोठे नेते पोलिसांना टार्गेट करत होते याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं.
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यात झालेलं प्रकार गंभीर होता . माझ्या घराकडे हा जमाव येत होता. एक पोलिसाची गाडी ती बाजूला गेली हे घडत होताना पोलीस निघून गेले. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये आहे. माझं घर जळत होत माझं कुटुंब आत होत आहे. माझा मुलगा मला फोन करत होता, बाबा लवकर घरी या. घरात बॉम्ब पडलं आहे. हे सर्व नियोजीत आहे. एकमेकांना इशारा आंदोलक ठरवत होते. एक तास माझं घर जळत होते.जाळपोळीत मराठा समाजाचा एकही व्यक्ती नव्हता. मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. माझं घर जळत होते पोलीसांचे कार्यलय माझ्या समोर होतं तरी देखील घर जळत होते तेव्हा पोलीस कुठे होते? या प्रकरणी गृहमंत्री न्यायालयीन चौकशी लावणार का? बीड घटनेचा मास्टमाईंड शोधावा.
कोणीही असो कारवाई केली जाणार : फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही घटना गंभीर घटना आहे. लोकप्रतिनिधींची घर जाळंण योग्य नाही. सर्व पक्षीय लोकांच्या घरावर आणि ऑफिसवर हल्ला झाला. अशा घटना राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस उपलब्ध होते त्यांनी नियंत्रण केलं. जमाव अधिक होता त्यामुळे कमी पडले. पोलीस प्रशासन कारवाई करत होते. या प्रकरणात काही लोकं दोन-तीन ठिकाणी दिसून आले. हल्ल्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून टिप्स आल्या. बीड जाळपोळी प्रकरणी 60 आरोपी फरार आहेत. पोलीसांची कारवाई यापेक्षा जास्त व्हायला हवी होती मात्र दंगलखोरांची संख्या जास्त होती. ज्यांचे पुरावे आहेत त्यांना पकडले आहे. पोलिसांची संख्या कमी होती दंगल करणाऱ्याची संख्या अधिक होती. कोणी मास्टरमाईंड आहे तपासात आहोत कोणीही असो कारवाई केली जाईल.
पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा : जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, या प्रकरणात अजूनही एटीएस स्थापन का करण्यात आली नाही. एवढा मोठा हल्ला होता पोलिसांना माहिती नाही असं होणार नाही. त्यांना तीन दिवस आधीच कल्पना होती. पण पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसत आहे. पोलिस कमीच असतात त्यांना हवेत फायरिंग करुन थांबवलं पाहिजे होते. याची चौकशी करण्यासाठी एसआयटी कधी स्थापन करणार आहे. इंटेलिजन्स फेल्युअर आहे.
राजकीय वळण देऊ नका : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कागदपत्रे तपासून पाहा. माजलगाव घटना पाहिली तर आंदोलन संपल्यानंतर घटना घडली. तुम्ही म्हणता फायरिंग केली असती पण त्या ठिकाणी तशी परिस्थिती नसेल. सराटीमध्ये पोलिसांनी भुमिका घेतली तर कोण काय भुमिका घेतली हे माहीत आहे. सीसीटीव्ही मध्ये सर्व येत नाही. जे लोक दिसत नाही त्याची ही नावं यामध्ये आहे. कठोर कारवाई करायला पाहिजे हे माहीत आहे. दोन दिवसात आपण एसआयटी स्थापन करुन कारवाई करु. राजकीय वळण देऊ नका.
संदीप क्षीरसागर म्हणाले, माझ्या घराच्या समोर पोलिसांची गाडी होती मग जर सायरन वाजवलं असत तरी ही हे झालं नसते. सकाळपासून हे सुरु होते मग पोलीस बंदोबस्त का वाढवला नाही. याच राजकीय भांडवल करु नका
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीडमध्ये र हजार लोक होती. माजलगावमध्ये 1500 होती. जी अटक केली आहे त्याच्या विरोधात पुरवा आहे. जर पुरावा असेल तर त्याला सोडू कोणाला अडकवायच नाही.मात्र चूक करणा-याला आपण वाचवत राहिले तर कोणत्याच लोकप्रतिनिधीच घर राहणार नाही.