(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Unseasonal Rain : महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका! राज्यात 'या' भागात पावसाची शक्यता
IMD Unseasonal Rain Update : महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचा धोका पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Maharashtra Weather Update Today : देशासह राज्यात (Maharashtra) थंडीची वाट (Cold Weather) पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा अवकाळीचा धोका (Unseasonal Rain) असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता हवामान बदलामुळे राज्यावर पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसात लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटलं आहे. या परिस्थितीत आजचं तापमान कसं असेल ते जाणून घ्या.
महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका
राज्यात अनेक भागात पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी (Cold Weather in Maharashtra) पाहायला मिळत आहे, तर दिवसा तापमानात वाढ झाल्याचंही दिसून येत आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात 'या' भागात पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानातील बदलामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
धुक्यामुळे रेल्वे आणि विमान वाहतुकीवर परिणाम
2024 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्तर पश्चिम भारत धुके आणि कडाक्याच्या थंडीने सुरुवात झाली. उत्तर भारतासह महाराष्ट्रही गारठला आहे. हवामान खात्याने तापमानात आणखी घट होऊन कडाक्याची थंडी पडण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये धुक्यामुळे रेल्वे आणि विमान वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. रेल्वे आणि विमान उड्डाणे उशिराने सुरु आहेत.
तापमानातही कमालीची घट
पर्वतीय भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली आहे. आयएमडीने थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे.