Maharashtra Weather Update : रायगड, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वर्ध्याला मुसळधार पावसाने झोडपलं
Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये.
Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीने पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रायगड, ठाणे, वर्धा आणि बुलढाण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. रायगडमध्ये पुन्हा परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. सलग चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा रायगडमध्ये धुमाकूळ घातलाय. रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, इंदापूर, रोहा परिसरात पाऊस जोरदार बरसलाय. त्यामुळे नागरिकांची अक्षरक्ष: तारांबळ उडाली आहे.
ठाणे जिल्ह्यातही पावसाची हजेरी
कल्याण डोंबिवली परिसरामध्ये परतीच्या पावसाचे आगमन गेल्या अर्ध्या तासापासून पाऊस कोसळत आहे. मेघ गर्जना सह विजेच्या कडकटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून परिसरामध्ये काळोख पसरला आहे.
वर्ध्यात सोयाबीनचे पीक घरी घेऊन जात असताना शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर सोयाबीनसह पुरात वाहून गेलाय. वर्ध्यातील आष्टी तालुक्याच्या शिरकूटणी येथे घटना घडलीये. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील शिरकुटणी या गावातील शेतकरी पुरुषोत्तम नागदेवते याने आपल्या सोयाबीनचे पीक काढले. ते पीक घरी घेऊन जात असताना अचानक आलेल्या पावसाने नाल्याला मोठा पूर आला. या पुरात ट्रॅक्टर सह सोयाबीनचे 40 पोते वाहून गेले आहे. सोयाबीनचे पोते पुलात पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्यात परतीच्या पावसाने थैमान घातलय. मलकापूर शहरातील सखल भागात पुराच पाणी शिरल्याने अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मलकापूर , दाताळा परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुऱ्हाणपूर - जालना मार्ग ठप्प गेल्या तीन तासांपासून ठप्प पडलाय. जिल्ह्यात रात्रभर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरुच आहे.
जिल्ह्यातील सर्व धरणे ओहरफ्लो
नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा या तीनही धरणाचे सर्व दरवाजे उघडले. नदीकाठच्या शेकडो गावाना सतर्क राहणाच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मोताळा,मलकापूर तालुक्यात नळगंगा नदीला मोठा पूर आलाय. अनेक गावात पाणी शिरले आहे. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीच नुकसान, मलकापूर तालुक्यात नळगांगा नदीला आलेल्या पुरामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
परभणीच्या येलदरी धरणाचे 2 दरवाजे उघडले
मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या परभणीच्या येलदरी प्रकल्प तीन वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरला असून दोन दिवसांपासून येलदरीच्या जलविद्युत प्रकल्पातील तीन टरबाइन मधून पाणी सोडण्यात आले असून दोन विद्युत संच ही सुरू झाले आहेत.वरच्या खडक पुर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग येलदरी त सुरू असल्यामुळे येलदरीचे दहापैकी दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडून 4220 क्यू सेक्स ने पाणी पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहे त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या