एक्स्प्लोर

मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट, कोकण, विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Forecast :

मुंबई : एकीकडे मान्सूनची चाहूल लागली असताना दुसरीकडे राज्यासह देशातील अनेक भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. देशात पुढील 48 तासात कोकणात आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे.

मान्सूनची चाहूल 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे, ही एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनची चाहूल लागली असून देशात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे.

मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात आणि ठाणे, पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला असून उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय, सिंधुदूर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि कोल्हापूरमध्येही उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस हा उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उन्हाचा कडाका

पुढील 48 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अशंतः ढगाळ वातावरण, तर दुपारी आणि संध्याकाळी निरभ्र आकाश राहील. मुंबई शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असं आयएमडीने म्हटलं आहे.

या भागात पावसाची शक्यता 

याउलट कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा या भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी पाहायला मिळतील. सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला या भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News : सोलापूरकरांसाठी दोन महत्त्वाच्या अपडेट्स, गॅस तुटवड्यामुळे हॉटेल इंडस्ट्री ठप्प होण्याच्या दिशेने, वाहतूक विभागाचा मोठा निर्णय
सोलापूरकरांसाठी दोन महत्त्वाच्या अपडेट्स, गॅस तुटवड्यामुळे हॉटेल इंडस्ट्री ठप्प होण्याच्या दिशेने, वाहतूक विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
Yogesh Kadam on LGP Gas Shortage: राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, पुढील काही दिवसात....
राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, पुढील काही दिवसात....
Ambadas Danve : भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
'ये रेशमी ज़ुल्फ़ें, ये शरबती आँखें'; ऐश्वर्या रायच्या मुलीचा जलवा, स्लीव्हलेस गाऊनमध्ये दिसते कमाल
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Embed widget