Maharashtra Weather Update : आणखी दोन दिवस थंडीची लाट; विदर्भ, मराठवाडाही गारठला
या कडाक्याच्या थंडीचा द्राक्षांवर मोठा परिणाम होणार असून मणीना तडे जाण्यासोबतच फुगवणी थांबणार आहे. या बागा वाचविण्यासाठी बळीराजा भल्या पहाटेपासून बागांमध्ये गवत जाळत शेकोटी करून मणींना ऊब देत आहेत.
Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. पुढील दोन दिवस राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानत घट राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांच्या तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2 दिवस राज्यात शीत लहर कायम राहणार आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होऊ शकते. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस जाणार आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहू शकतो. पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. कमाल तापमानात घट दिसणार मात्र किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही.
आज राज्यातील अनेक ठिकाणांवरील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली, तर कमाल तापमान देखील सरासरी 24 अंशांवर पोहचलं आहे. नंदुरबारमधील तोरणमल येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तोरणमल येथील किमान तापमान 3.6 अंश सेल्सिअसवर पोहचलं. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीडमधील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहणार, दिवसाच्या तापमानातही घट दिसेल.
सातारा जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. वेण्णालेक परिसरात 4.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये पारा 6.5 अंशावर पोहोचला आहे. वाईमध्ये 9 अंश तर, साताऱ्यामध्ये 11.3 अशं तापमान आहे. नाशिकच्या निफाडमध्येही पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोहोचल्याने बळीराजा समोर मोठं संकट उभं राहीलं आहे. या कडाक्याच्या थंडीचा द्राक्षांवर मोठा परिणाम होणार असून मणीना तडे जाण्यासोबतच फुगवणी थांबणार आहे. या बागा वाचविण्यासाठी बळीराजा भल्या पहाटेपासून बागांमध्ये गवत जाळत शेकोटी करून मणींना ऊब देत आहेत.