मध्य उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता, IMD नं दिला यलो अलर्ट, वाचा सविस्तर अंदाज
अरबी समु्द्रात तयार होत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आर्दता वाढली आहे. परिणामी राज्यात येत्या काही दिवसात किमान तापमान हळूहळू 2-3 अंशांनी वाढणार आहे
Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला असून चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. अरबी समुद्रातही आर्दता वाढल्याने राज्यात येत्या काही दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे.आर्दता वाढली असून गारठा कमी झालाय. मध्य महाराष्ट्रात 26-28 डिसेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचं IMD ने सांगितलंय.
अरबी समु्द्रात तयार होत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आर्दता वाढली आहे. परिणामी राज्यात येत्या काही दिवसात किमान तापमान हळूहळू 2-3 अंशांनी वाढणार आहे.इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात 24 व 25 डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट कायम असून हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान तसेच इशान्येकडील राज्यांना कडाक्याच्या थंडीचा अलर्ट देण्यात आलाय.
पावसाचा यलो अलर्ट
राज्यात विदर्भासह मध्य महाराष्ट्रात तीन दिवसांनी म्हणजेच 26 डिसेंबरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. धुळे, नंदूरबार, नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
राज्यात पुढील 5 दिवस कसं राहणार तापमान?
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे, जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे. कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या 4-5 दिवसात किमान तापमान चढेच असेल. येत्या 24 तासांत किमान तापमानात हळूहळू 2-4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील पाच दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.