महाराष्ट्र तापला! अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे, अकोल्यात पारा 44 वर
Maharashtra Weather Report : आज राज्यभरात तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअल पार पोहोचलं आहे.
![महाराष्ट्र तापला! अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे, अकोल्यात पारा 44 वर maharashtra Weather report temperature Rise in Maharashtra Heatwave mercury crossed 40 degree Celsius Today temperature is 44 degree Celsius in Akola महाराष्ट्र तापला! अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे, अकोल्यात पारा 44 वर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/04/df0609a1342165669f9288b49d22e19c1714832310540322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात उन्हाच्या झळा (Heat Wave) बसताना दिसत आहे. राज्यातील तापमानात (Temperature Rise) प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Weather Report) अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heatwave) आल्याचं दिसून येत आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवस तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यानुसार, आज राज्यभरात तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअल पार पोहोचलं आहे. अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात आज 44.3 अंश सोल्सिअल तापमान नोंदवलं गेलं आहे.
वर्ध्यात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
वर्ध्यात तापमानात सतत चढउतार होत आहे. दुपारच्या सुमारास कडक ऊन पडत असल्याने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. वर्ध्यात 43 अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. दुपारी नागरिक घराच्या बाहेर पडताना तोंडाला रुमाल अथवा ओढणी बांधून किंवा छत्री घेऊन बाहेर पडत आहेत. तर दुपारच्या सुमारास रस्ते देखील ओसाड झाले आहेत. 43 अंशावर पोहचलेले तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे.
महाराष्ट्र आज तापमानाचा पारा 40 पार
- अकोला 44.3
- अमरावती 43.8
- चंद्रपूर 43.8
- वर्धा 43
- वाशिम - 43
- ब्रह्मपुरी - 43.7
- यवतमाळ - 42.2
- परभणी - 43.6
- सांगली - 41.6
- छत्रपती संभाजीनगर - 41.6
- मालेगाव - 42.8
- जळगाव - 42.3
- सातारा - 40.9
- नांदेड - 43.2
- अहमदनगर - 40.8
- उदगीर - 42.6
- पुणे - 39.6
- जालना - 42
- सोलापूर - 43.4
- बारामती - 40.5
- बीड - 43.1
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)