Waterfalls : पावसाळ्यात सहलीचा प्लॅन करताय? मग मुंबईजवळील 'या' धबधब्यांना नक्की भेट द्या...

Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.

abp majha web team Last Updated: 27 Jun 2023 01:48 PM
धुळे शहरात पावसाची हजेरी...

Dhule Rain : धुळे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, एकीकडे प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांना पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे... अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

Waterfalls : पावसाळ्यात सहलीचा प्लॅन करताय? मग मुंबईजवळील 'या' धबधब्यांना नक्की भेट द्या...
Monsoon Trip Places : मुंबईजवळील धबधबे तुमच्यासाठी वीकेंडचा आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. या धबधब्यांना तुम्ही नक्की भेट द्या. Read More
नंदूरबार शहर आणि तालुक्यात पावसाला सुरुवात

Nandurbar Rain News : नंदूरबार शहर आणि तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर नंदुरबार शहर आणि परिसरात सुरु असलेल्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

Rain : घणसोली स्थानकातील सबवेमध्ये साचलं पाणी

Rain : घणसोली स्थानकातील सबवेचे स्विमिंग पूलमध्ये रुपांतर झाल्याची स्थिती आहे. दरवर्षी पावसाळ्यात होते अशीच परिस्थिती झाली आहे. सबवेमधील अनेक ठिकाणी लिकेज आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमा होत आहे. लीकेज दुरुस्तीचे काम करण्यात दिरंगाई होत आहे. 

लोणावळ्यात 24 तासांत 97 मिमी पावसाची नोंद

Rain : पुण्यातील थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केलीये. गेल्या चोवीस तासांत इथं तब्बल 97 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. तर 48 तासांत 182 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. पुढील आठवडा भर पावसाने अशीच कृपादृष्टी दाखवली तर इथला निसर्ग आणखी बहरेल. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील धबधबे आणि भुशी धरण ही ओसंडून वाहतील. मग हा परिसर आपोआप पर्यटकांनी ही फुलून जाईल.

Maharashtra Rain :  राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे, तर काही जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं (IMD) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  





 



भंडाऱ्यात रात्रीपासून दमदार पाऊस, शेतीच्या कामाची लगबग सुरु

Rain : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल दुपारपासून भंडाऱ्यात सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता. आज सकाळपासूनही पावसाने उसंत घेतलेली नाही. या दमदार पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकळ्यापासून सुटका झाली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना पावसानं हजेरी लावली नसल्यानं शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र, दमदार पावसानं आता शेतीच्या कामांना शेतकरी बांधव लागल्याचं चित्र बघायला मिळणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates: राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान,  राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे. 


राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी


राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. 


कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज  हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.


शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या


राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.