Nashik Monsoon Crop : शेतकऱ्यांनो, इकडं लक्ष द्या! पेरणीसंदर्भात नाशिक कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन 

Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे.

abp majha web team Last Updated: 24 Jun 2023 02:30 PM
Maharashtra: पावसाळा आला! विकेंडला फिरायचा प्लॅन करताय? तर 'या' पर्यटनस्थळांना एकदा भेट द्यायलाच हवी
Monsoon: यंदा पावसाळ्याने जूनच्या अखेरीस आपलं डोकं वर काढलं आहे आणि पावसाच्या आगमनाने अनेकांना फिरायला जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र फिरायला जायचं कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर पाहूया... Read More
Monsoon : मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल, भारतीय हवामान विभागाची घोषणा

Monsoon News : अखेर मान्सून (Monsoon) मुंबईच्या (Mumbai) वेशीवर दाखल झाला आहे. पुढील 48 तासात मान्सून मुंबई दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. मोसमी वारे अलिबागपर्यंत सक्रिय झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली आहे. राज्याची उपराजधानी नागपुरातही (Nagpur) मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Nashik Monsoon Crop : शेतकऱ्यांनो, इकडं लक्ष द्या! पेरणीसंदर्भात नाशिक कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन 
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा कृषी विभागाने पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना पेरण्यासंदर्भात आवाहन केले आहे.  Read More
Kolhapur Weather Update: कोल्हापुरात अखेर वरुणराजाचे आगमन, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही दमदार सलामीची प्रतीक्षा 
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Weather Update) आगमन केले आहे. गुरुवारी राधानगरी धरण क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींनी हजेरी लावली. Read More
पुरंदरमध्ये पावसाचं आगमन, बळीराजा सुखावणारं

Pune Rain : पुरंदरमध्ये आज पावसाचं आगमन झालंय. आज सकाळपासूनच तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सकाळी दहा वाजता सासवड परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर तालुक्याच्या इतर भागातही पावसाळा सुरुवात झाली. साडेअकरानंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळं आता बळीराजा सुखावणारं आहे .संपूर्ण महिना शेतकरी पावसाची वाट पाहत होता. मात्र, शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीची कामे करण्यासाठीची लगबग सुरु होणार आहे.. बारामती शहरात देखील पावसाने हजेरी लावली.

Sindhudurg Rain : पहिल्याच पावसानं मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पोलखोल


Sindhudurg Rain : पहिल्याच पावसानं मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आहे. कणकवलीत चक्क या महामार्गामुळं सर्व्हिस रोडवर धबधबे वाहतानाचे चित्र दिसून आले. कणकवली येथे महामार्गावर मोठा ब्रीज बनवण्यात आला. या ब्रिजच्या कामाबद्दल वारंवार शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यातच पहिल्या पावसाने या ब्रिजवरून पाणी वाहताना दिसून आले. ब्रिजवरुन पडणाऱ्या या पाण्यामुळे सर्व्हीस रोडवरून जाणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अजून पावसाने हवा तसा जोर धरलेला नाही. त्यातच महामार्गाची ही अवस्था झाल्यामुळं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


चिपळूणमध्ये आज सकाळपासूनच पावसाच्या सरी

Ratnagiri rain :  चिपळूणमध्ये आज सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळं बळीराजाला दिलासा मिळाला आहे. 

Pune Rain Update : अखेर प्रतीक्षा संपली! पुण्यात तुरळक पावसाला सुरुवात
Pune Rain Update: मागील काही दिवसांपासून पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर पुणेकरांची पावसाची प्रतिक्षा संपली आहे. पुण्यातील काही परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. Read More
ठाणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली.. ठाण्यात संततधार पावसाला सुरुवात..

Thane Rain : मुंबईप्रमाणं ठाण्यासह, कळवा आणि मुंब्रासारख्या उपशहरांमध्ये आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठाणे, कळवा मुंब्रा येथे सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळं परिसरातील वातावरण थंड झाले आहे. काल सकाळी पावसाच्या काही सरी बरसल्यानंतर दिवसभर पावसाने उसंती घेतली होती. त्यानंतर आज सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे. या दरम्यान सकाळपासूनच ढगाळ वातावरण पसरले होते. एक ते दीड तास संततधार पाऊस पडल्यानंतर पाऊसाचा जोर पूर्णपणे कमी झाला आहे.

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात...

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने नारिकांची मोठी तारांबळ उडाली. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. तीव्र उन्हाच्या झळा बसत असून त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आज आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर सर्वत्र पावसाची हजेरी, मृग नक्षत्र पहिल्यांदाच कोरडे


Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत असून बळीराजा सुखावला आहे. यावर्षी पावसाने मृग नक्षत्र पहिल्यांदाच कोरडे घालवले. मात्र काल सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला आणि  जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासीयांना आणि भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस पडत असल्याने दिलासा मिळाला आहे. पाऊस बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जिल्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, मालवण तालुक्यात पाऊस पडत आहे.


बुलढाण्यात धुक्याची चादर, मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा...

Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात काही महिन्यापासून सूर्य आग ओकतोय. उन्हाचा पारा वाढतच गेला त्यामुळे नागरिक कालपर्यंत हैराण झाले होते. मात्र आज सकाळी अचानक बुलढाणा शहरातील काही भागात धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह दिसून आलाय. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला असून अद्यापपर्यंत जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांसह नागरिक आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत..आज सकाळी मात्र बुलढाणा शहरा नजिक असलेल्या राजूर घाटात  धुक्याची चादर दिसून आली असून ढगाळ वातावरण बनले असून हवेत थोडाफार गारवा निर्माण झाला आहे..

Mumbai Rain : पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात

Mumbai Rain : पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विलेपार्ले, वांद्रे परिसरात जोरदार पाऊस सुरु झालाआहे.

Palghar Rain : पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात

Palghar Rain : पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरु झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. खोळंबलेल्या पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. मुंबईत (Mumbai) देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 


राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान,  राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे. 


राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी


राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. 


कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज  हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.


शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या


राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.