Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक फार आळशी असतात. आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय त्यांना असते. त्यांच्या आळसामुळे हुशार असूनही ते यशाच्या मार्गावर मागे पडतात.
Numerology Mulank 7
1/10
अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 7 च्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
2/10
मूलांक 7 चे लोक स्वभावाने आळशी असतात. 7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक आळशी असले तरी ते अद्भूत व्यक्तिमत्त्वाचे असतात. या मूलांकाशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
3/10
7, 16 किंवा 25 जन्मतारखेचे लोक हे अतिशय आळशी असतात. रेंगाळत सगळी कामं करण्याची सवय यांना असते. प्रत्येक कामाचा त्यांना आळस आलेला असतो, म्हणूनच ते सगळ्या गोष्टींत मागे पडतात.
4/10
हे लोक हुशार असतात, परंतु त्यांच्या आळसामुळे यश त्यांच्याकडे लवकर चालून येत नाही.
5/10
यशाची पायरी चढायला यांना काहीसा वेळ लागतो. आजचं काम उद्यावर टाकण्याची सवय यांना भारी पडते, त्यांच्या या स्वभावामुळे कधी-कधी आलेल्या संधीही त्यांच्या हातून निसटून जातात.
6/10
मूलांक 7 चे लोकांचं व्यक्तिमत्त्व हे पांडासारखं असतं. त्यांना आराम करायला एखादी जागा मिळाली तर ते तिथेच रेंगाळत राहतात. परंतु एकदा घराबाहेर पडले की हे लोक लगेच अॅक्टिव्ह होतात. नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करणं यांना आवडतं.
7/10
7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात. ते आपल्या वाणीच्या आणि बुद्धीच्या जोरावर सगळी कामं पूर्ण करतात, भलेही ती कामं करायला ते थोडा उशीर करत असतील.
8/10
कामात हे लोक स्मार्ट असतात, नोकरी असो किंवा व्यवसाय, या दोन्हीमध्ये ते चांगलं यश मिळवतात. या लोकांना कमी मेहनत करूनही आयुष्यात अधिक यश मिळतं.
9/10
मूलांक 7 चे लोक खूप धाडसी असतात आणि ते कोणत्याच आव्हानांना घाबरत नाहीत. ते आपल्या बुद्धीने आणि धैर्याने प्रत्येक आव्हानावर मात करतात. धाडसी गोष्टी करायला यांना खूप आवडतं, त्यांचं मन कधीच शांत राहत नाही.
10/10
प्रेम आणि मैत्रीमध्ये या लोकांची अनेकदा फसवणूक होते. या लोकांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 07 Oct 2024 03:13 PM (IST)