सावधान! आज कसं असेल राज्यातील हवामान? कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट
हवामान विभागानं (IMD) सांगितलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Maharashtra Weather News : राज्याच्या विविध भागात पावसाचा (Rain) चांगलाच जोर पाहायला मिळत आहे. कुठं मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तर काही भागात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) सांगितलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
कोणत्या भागात पडणार जोरदार पाऊस?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागातील नागरिकांना सावधानतेचा इशार देण्यात आला आहे. दुसरीकडं सिंधुदुर्गसह सातारा आणि मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
काही भागात पावसाची दडी, शेतकरी चिंतेत
नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात कमी पाऊस झाला आहे, असे असून सुद्धा शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरण्या केल्या आहेत. चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढवलं आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 40 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यातील अर्धापुर येतील शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने बेडवर सोयाबीन लागवड केली आहे. आता पाऊस नसल्याने सोयाबीन उगवन क्षमता कुंटली आहे. त्यामुळं सोयाबीनची वाढ सुद्धा होत नाही. हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे. आता पाऊस आला नाही तर दुभार पेरणीच संकट असल्याचे शेतकरी सांगत आहे.
30 जूनपर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा
दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. मात्र, ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला आहे, त्याठिकाणचे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान, राज्यात उद्यापर्यंत (30 जूनपर्यंत) मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या: