एक्स्प्लोर

पावसामुळे मंदिराच्या शेडवर झाड कोसळले, 6 जणांचा मृत्यू, 12 जणांना वाचवले, आणखी भाविक अडकल्याची भीती 

rain update  : आज अकोल्यातही अवकाळी पावासाने हजेरी लावली. या वादळी पावासामुळे अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळले.

Akola rain update  : राज्यात सध्या अवकाळी पावासाचा कहर सुरु आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज अकोल्यातही अवकाळी पावासाने हजेरी लावली. या वादळी पावासामुळे अकोल्यातील पारस गावातील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळले. या शेडमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या शेडखाली आणखी काही भाविक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसामुळे मदतीला अडचण निर्माण होत आहे. सततच्या पावसामुळे झाड बाजूला करताना अडचणी येत आहेत. 

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. अकोला जिल्ह्यातील पारस गावात वादळानं लिंबाचं मोठं झाड बाबूजी महाराज मंदिराच्या शेडवर कोसळले. आतापर्यंत 6  जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या शेडखाली काही भाविक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शेडवर पडलेलं झाड हटविण्यात पावसामुळे अडचणी येत आहेत. घटनास्थळावर हवा आणि पावसाने मदत कार्यात अडचण होत आहे. स्थानिकांच्या मदतीने हे झाड हटवण्याचे काम सुरु आहे. या दुर्देवी घटनेत अद्याप कोणताही जिवतहानी झाल्याचे वृत्त नाही. 

हिंगोलीत अवकाळीचा कहर -

हिंगोलीतही वादळी पाऊश हिंगोली जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कान्हेरागावनाका वाढोना कलबुर्गा चींचपुरी मोप फळेगाव भागात  मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. तर जोरदार पावसामुळे आणि गारांच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हळद भाजीपाला पिके त्याचबरोबर फळबागांचे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काहीच दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील गहू ज्वारी हरभरा पिकांचे नुकसान झाले होते. तर उर्वरित पिकांचे या पावसाने नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

नाशिकलाही पावसाने झोडपले -
 
- नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. देवळा, नांदगाव, कळवण मध्ये गारपीट झाली आहे.  नाशिक जिल्ह्यात सलग अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले. नांदगावच्या शास्त्रीनगर , धनेर, पोखरी, बोलठाणसह परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार  गारपीट झाल्याने सर्वत्र गारांचा खच पडून उन्हाळ, कांदा बियाण्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कळवणच्या मानूर ,  देवळा तालुक्यातील चिंचवे, वाजगाव परिसरातही  गारा पडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागत आहे.  

परभणीत अवकाळीचा फटका -
परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात आज सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस बरसलाय.दुपारच्या सुमारास वादळी वारे,ढगांचा प्रचंड गडगडाट आणि जोरदार पाऊस सर्वत्र बरसला यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती परभणीकरांना आलीय. सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला या दोन दिवसाच्या पावसाने अनेक ठिकाणी काढणी राहिलेल्या गव्हासह फळ पिकांचे नुकसान झाले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Embed widget