एक्स्प्लोर

किमान दोन दिवस पूरग्रस्त असाल तरच मोफत अन्नधान्य, राज्य सरकारचा अजब जीआर

तसेच आघाडी सरकारच्या काळात हीच मर्यादा 7 दिवसांची होती आणि ती या सरकारनं दोन दिवसांवर आणल्याचंही सरकारनं म्हटलंय.

मुंबई : कोल्हापूर, सांगलीसहित राज्यात हजारो लोक पुराच्या विळख्यात असताना सरकारने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला खरा, परंतु हा हात तोकडा पडत असल्याचं दिसत आहे. कारण या मदतीद्वारे सरकारने पूरग्रस्तांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.  पूरग्रस्ताचं क्षेत्र दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाण्यात बुडालं असेल तरच मोफत अन्नधान्य (10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ) देणार, असा जीआर सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने 7 ऑगस्ट रोजी जारी केला आहे. एकीकडे लोक पाण्यात असताना, अडचणीत असताना या अटी आणि शर्तींमुळे सरकार राज्यातील पूरग्रस्तांची थट्टा करण्यात धन्यता मानत आहे. मात्र, हा केवळ उल्लेख असून, पुरात अडकलेल्या लोकांना सर्व मदत पोहोचवण्याचं काम आधिच सुरु झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. तसेच आघाडी सरकारच्या काळात हीच मर्यादा 7 दिवसांची होती आणि ती या सरकारनं दोन दिवसांवर आणल्याचंही सरकारनं म्हटलंय. दरम्यान दिली जाणारी मदतही वाढवल्याचा सरकारचा दावा आहे. किमान दोन दिवस पूरग्रस्त असाल तरच मोफत अन्नधान्य, राज्य सरकारचा अजब जीआर चार दिवस कुठे होता? सांगलीत पाहणीसाठी गेलेल्या महाजन आणि देशमुखांना पूरग्रस्तांनी घेरलं राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना सांगलीतील पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना दोन्ही मंत्र्यांना स्थानिकांनी घेरलं. तुम्ही चार दिवस कुठे होता? प्रशासनाने मदत पोहोचवण्यास उशीर का केला, असा सवाल त्यांनी विचारला. "तुम्ही यात्रा काढत आहात, तुमची यंत्रणा चुकीची आहे, आम्हाला यांची मदत नको, आम्ही सक्षम आहोत," अशी उद्विग्न प्रतिक्रियाही ग्रामस्थांनी दिली आहे. सेल्फी व्हिडीओमध्ये गिरीश महाजन यांची हसून दाद दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल (8 ऑगस्ट) कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा बोटीतून आढावा घेतला. परंतु यावेळी कार्यकर्त्याने काढलेल्या सेल्फी व्हिडीओला गिरीश महाजन यांनी हसून दाद देताना दिसत आहे. त्यामुळे हजारो-लाखो लोक पुरात अडकले असताना मंत्री आनंदात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget