Sanjay Raut : सभा होणारच! छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होऊ नये म्हणून कारस्थान, राऊतांचा आरोप
Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. ही सभा होऊ नये म्हणून कारस्थान केलं जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला.
Sanjay Raut : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कुठे आहेत? असा सवाल शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. ही सभा होऊ नये म्हणून कारस्थान केलं जात असल्याचा आरोप राऊतांनी केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि सभेला परावनगी नाकारायची यासाठी हे सगळं केल जात असल्याचे राऊत म्हणाले.
काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकरली
महाराष्ट्रासह देशभरात राम नवमीच्या निमित्तानं दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी हा प्रयत्न यशस्वी झाला. अनेक ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंज्यसाची भूमिका घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे. ती सभा होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या कारणाखाली सभेला परवानगी मिळू नये हे कारस्थान असल्याचे राऊत म्हणाले. यापूर्वी रामनवमी दिवशी कधी हल्ले झाले नव्हते. सध्या शिवसेनेच्या खेड, मालेगावमधील सभेला जो प्रतिसाद मिळत आहे ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. त्यांनतर काही लोकांना हाताशी धरुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राऊत म्हणाले. कारण नसताना जातीय तेढ निर्माण केली जात असल्याचे राऊत म्हणाले.
राज्यात गृहमंत्र्यांचं अस्तित्व दिसत नाही
राज्यात गृहमंत्र्याचं अस्तित्व दिसत नाही. गृहमंत्र्याचं अस्तित्व फक्त विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्याचे आदेश देण्याइतपत आहे. विरोधी पक्षांच्या लोकांवर आजही खोट्या कारवाया करणं, खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला. यापूर्वी राज्यामध्ये असं कधी झालं नव्हतं. पण लक्षात ठेवा डाव उलटा पडला तर आम्ही सत्तेवर येऊ, तेव्हा तुम्हाला याची सगळी उत्तर द्यावी लागतील, खासकरुन पोलिसांना असा इशारा राऊतांनी दिला.
संभाजीनगरमध्ये झालेली दंगल सरकारप्रणित
दोन एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या सभेला लाखो लोक हजेरी लावणार आहेत. त्या ठिकाणी झालेली दंगल ही सरकारप्रणित असल्याचा आरोप राऊतांनी केला. मुंबईमध्येही तसे प्रयत्न केले जात आहेत. ते लोक भीत आहेत. हिंदू मुस्लिमांचा नावाखाली काही लोक राजकारण करत असल्याचे राऊत म्हणाले. काहाही झालं तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणारच असे राऊत म्हणाले. गुजरातमध्येही दंगे झाले. हे सगळं दंगे सरकारप्रणित आहेत. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. तरीसुद्धा दंगे होत आहेत. आमची महाराष्ट्रात अडीच वर्ष सत्ता होती, तेव्हा कुठेही दंगली घडल्या नाहीत असे राऊत म्हणाले. भाजपचे राज्य असणाऱ्या राज्यातच दंगे का होतात असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. दंगल करण्यास काही लोकांना पुढे केलं जात असल्याचेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
संभाजीनगर: सुखरूप घरी परतलेल्या पोलीस बापाला पाहून मुलीने हंबरडा फोडला; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ