एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
साताऱ्यात बस डेपोमधल्या सहा शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी; बस पेटवणारा तरुण ताब्यात
साताऱ्यात बस डेपोमध्ये पार्क असलेल्या सहा शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. एका तरुणाने बसला लावली त्यानंतर इतर पाच बस पेटल्या अशी माहिती समोर येत आहे. बस पेटवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
![साताऱ्यात बस डेपोमधल्या सहा शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी; बस पेटवणारा तरुण ताब्यात Maharashtra Satara Six Shivshahi buses parked bus depot caught fire साताऱ्यात बस डेपोमधल्या सहा शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी; बस पेटवणारा तरुण ताब्यात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/10235020/Satara-Shivshahi-bus-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : साताऱ्यात एसटी बस डेपोमध्ये सहा शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. एका तरुणाने पार्क असलेल्या बसला आग लावली. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर पाच बसेनही पेट घेतला. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.
दरम्यान बसला आग लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. परंतु त्याने आग का लावली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याच्या चौकशीअंतीच नेमंक कारण समजू शकेल.
आगीच सहा गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे. पोलीस दलही घटनास्थाळी पोहोचलं आहे. या आगीत शिवशाही बस जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या घटनेनंतर बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)