(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिजलेले काडतूस महाराष्ट्राने खूप पाहिले, सीबीआय, ईडी बाजूला ठेवा मग... संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
फडतूस हा अतिशय सौम्य शब्द असून फडतूस म्हणजे अर्थहीन असे राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे
नवी दिल्ली: ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक रोशनी शिंदे (Thane Roshni Shinde Attack) यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर फडणवीसांनी खरपूस समाचार घेतला. आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांवर घणाघात केला आहे. भिजलेले काडतूस खूप पाहिले, सीबीआय, ईडी बाजूला ठेवा मग काडतूसचा अर्थ सांगतो असे म्हणत संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. फडतूस हा अतिशय सौम्य शब्द असून फडतूस म्हणजे अर्थहीन असे राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याच्या आरोपांखील अटक करण्यात आली होती. सुनावणीअंती त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान याचप्रकरणाचा दाखला देत संजय राऊतांनी भाजपवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील, ट्रम्प यांचे 'सूटबूट' भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ होतील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री करावी, असं म्हणत सामनातून भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.
संजय राऊत म्हणाले, आम्ही कुठं बोललो झुका म्हणून हे सगळे झुके आहेत. डॉ मिंधे यांच्या टोळीने एका आमच्या महिलेवर हल्ला केला. त्यांना भेटीसाठी उद्धव ठाकरे गेले होते. त्या महिलेवर हल्ला झाला. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नपुसंक म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी तर अतिशय सौम्य शब्दात टीका केली.
गृहमंत्री झाल्याची अडचण महाराष्ट्राला आहे. तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात तीन लोकांनी आत्महत्या केल्या. तुम्ही आम्हाला धमक्या देता. ईडी आणि सीबीआय तुमचे बॉडीगार्ड आहेत, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना अयोद्धा आम्ही दाखवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अयोध्या दौरा खूप महत्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाल, मुख्यमंत्र्यांना अयोद्धा आम्ही दाखवली. मुख्यमंत्री असल्याने अयोद्धेच्या गल्ल्या माहित झाल्या असतील पण हे साधे बेळगावला पण गेले नव्हते.
इतर महत्त्वााच्या बातम्या :