Omicron Cases In Maharashtra : राज्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येची भर पडत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी राज्यात 79 ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 876 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 876 रुग्णापैकी 381 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 79 रुग्णापैकी 57 रुग्ण मुंबईतील आहेत. तर ठाणे महानगरपालिकेतील 7, नागपूर सहा, पुणे महानगरपालिका 5, पुणे ग्रामीण 3 आणि पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यात कुठे किती रुग्ण -
राज्यातील एकूण एकूण 876 ओमायक्रॉन रुग्णापैकी 26 रुग्ण इतर राज्यातील आहेत. तर जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबादमधील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सात रुग्ण ठाण्यातील आणि चार रुग्ण कोल्हापूरमधील आहेत.. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात आढळले आहेत.
24 तासात राज्यात 36 हजार नव्या रुग्णांची नोंद, 13 जणांचा मृत्यू
राज्यात आज एकाच दिवसात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 8,907 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 65 लाख 33 हजार 154 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.17 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.08 इतका झाला आहे. राज्यात सध्या 5 लाख 85 हजार 758 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये असून 1368 व्यक्ती या संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- सावधान! येता आठवडा धोक्याचा, प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन
- Maharashtra Coronavirus Lockdown : राज्यात लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितला ठाकरे सरकारचा निर्णय
- परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई, BMC चा मोठा निर्णय
- Mumbai Corona Update : मुंबईत लॉकडाऊन लागणार?, 24 तासांत 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live