Mumbai Coronavirus : दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोविड रुग्णांना मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. तशा सूचना मुंबई महापालिकेनं खासगी रुग्णालयांन दिल्यात. कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिकेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयांना 80 टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आलंय. तसंच सरकारनं निर्देशित केलेले दर आकारणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे. 


मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानं महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी  दुसऱ्या लाटेप्रमाणेच पालिकेच्या परवानगीशिवाय खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णाला दाखल करू नका, अशा सक्त सूचना प्रशासनाने रुग्णालयांना दिल्या आहेत. यासाठी पालिकेने नुकतिच खासगी रुग्णालयांसाठी नियमावलीही जाहीर केलीये.. यासोबत बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवा, अशा सूचनाही  पालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.


पाहा व्हिडीओ : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? काल मुंबईतली आजवरची सर्वात मोठी वाढ



तिसरी लाट धडकली? मुंबईकरांनो पुढील आठवडा जिकरीचा


कोरोनानं मुंबईची काळजी वाढवली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोना रुग्णांचा उद्रेक होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत दिवसभरात 20 हजारांच्या घरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तर लॉकडाऊन लावावा लागेल, असे संकेत आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले आहेत. काल (बुधवारी) मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजार 166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का? असा प्रश्न आता सर्वांना सतावू लागला आहे. 


पुढील आठवडा मुंबईसाठी अधिक काळजीचा आहे. मुंबईत पुढील तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लावण्याबाबर निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. मुंबईत तिसरी लाट धडकली असून रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे रोज वाढणारी रुग्ण संख्या मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?


देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जर मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर मुंबईत कठोर निर्बंध लादण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. 


सध्या मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येची समोर येणारी आकडेवारी काळजाचा ठोका चुकवणारी आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 15 हजार 166 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 61 हजार 923 सक्रिय रुग्ण आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह