Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये (Mumbai) पुन्हा एकदा कोरोना महामारीने (Corona Virus) हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. बुधवारनंतर गुरुवारीही मुंबईतील नव्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत 20 हजार 181 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आढळल्यास मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मुंबईत 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने आता लॉकडाऊन लावलं जाईलं का? असा प्रश्न समोर येत आहे.
पालिकेकडून सक्तीच्या उपाययोजना -
एखाद्या इमारतीत किंवा विंगमध्ये राहत असलेल्या एकूण रहिवाशांपैकी 20 टक्के रहिवाशांना कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइनसाठी देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि नियमांचे सक्तीने पालन करावे लागणार आहे. हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. ते पाचव्या किंवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर करू शकतील. जर लक्षण आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर करावी लागेल असेही महापालिकेच्या नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- सावधान! येता आठवडा धोक्याचा, प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन
- Maharashtra Coronavirus Lockdown : राज्यात लॉकडाऊन लागणार? आरोग्यमंत्र्यांनी सांगितला ठाकरे सरकारचा निर्णय
- परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई, BMC चा मोठा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह